Bollywood Actress Hotel In Goa Dainik Gomantak
गोवा

Actress Hotel In Goa: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे गोव्यात होणार आलिशान हॉटेल, पहिल्यांदाच केली मोठी गुंतवणूक

विशेष म्हणजे या अभिनेत्रीने शिक्षण देखील पूर्ण घेतलेले नाही. मात्र, ती बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Bollywood Actress Hotel In Goa: गोवा, भारत आणि विदेशातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. गोव्यात अनेक नेते, अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा हॉटेल व्यवसाय आहे.

बॉलिवूडमधील अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे गोव्यात आलिशान हॉटेल असून, याबाबत अनेकांनी माहिती नाही. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने शिक्षण देखील पूर्ण घेतलेले नाही. मात्र, ती बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) गॉडफादरशिवाय प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. भूमीची गणना आजच्या काळात बॉलिवूडमधील यशस्वी कलाकारांमध्ये केली जाते.

भूमीचा जन्म मुंबईतच झाला. मात्र, तिला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. तिला शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही.

भूमीने आर्य विद्या मंदिरातून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर, अभिनय शिकण्यासाठी तिने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये प्रवेश घेतला, परंतु कमी उपस्थितीमुळे तिला शिक्षण सोडावे लागले.

अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar Business) हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातून व्यावसायिक जगतात पाऊल ठेवले.

भूमीने क्रोम एशिया हॉस्पिटॅलिटीच्या पहिल्या बुटीक हॉटेल KAIA मध्ये गुंतवणूक केली आहे. गोव्यात असलेले हे हॉटेल 30 हजार स्क्वेअर फूटमध्ये तयार केली जात आहे. या हॉटेलमध्ये 10 खोल्या आणि 4 खोल्यांचा व्हिला असतील.

2019 मध्ये क्रोम एशिया हॉस्पिटॅलिटी कंपनीची स्थापना झाली. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 56.4 कोटी रुपये होता. कंपनीचे अनेक शहरांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, बार इ. आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT