Bollywood actors Indian cricketer who own house in goa 
गोवा

कोणाचा व्हिला तर कोणाचे पोर्तुगीज स्टाईल घर; गोव्यात अलिशान घर असणारे बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर

गोव्यात कोणकोणत्या कलाकार आणि क्रिकेटर यांनी घर खरेदी केले आहे याची माहिती.

Pramod Yadav

Bollywood actors Indian cricketer who own house in goa: गोव्यात घर, बंगला असावा अशी अनेकांची इच्छा असते. बॉलिवूड स्टार्ससह क्रिकेट खेळाडू देखील गोव्यात घर घेण्यासाठी धडपड करत असतात. काही बॉलिवूड कलाकारांनी गोव्यात बंगला तसेच पोर्तुगीज स्टाईलचे घर खरेदी केले आहे.

फिल्म स्टार्स गोव्यातील व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. गोव्यात कोणकोणत्या कलाकार आणि क्रिकेटर यांनी घर खरेदी केले आहे, याची माहिती घेणार या लेखातून घेणार आहोत.

गोव्यातील जीवन अतिशय आरामदायी आहे, प्रत्येकाला येथे सुट्टी साजरी करायला आवडते. येथील समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य आणि नाईट लाइफ सर्वांना आकर्षित करते. सेलेब्सना देखील हे ठिकाण खूप आवडते. सुपरस्टार अक्षय कुमारपासून प्रियंका चोप्रापर्यंत अनेकांची गोव्यात घरे आहेत.

कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदी हिनेही गोव्यात घर विकत घेतले आहे. उत्तर गोव्यात पूजा बेदीचे सुंदर घर आहे. घराची ठेवण अतिशय आकर्षक आहे. पूजाने तिच्या आवडीनुसार घराचे इंटीरियर प्लॅनिंग केले आहे.

Pooja Bedi

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी यांचेही गोव्यात घर असून, त्यांचा उत्तर गोव्यातील नागोवा येथे पोर्तुगीज शैलीचा व्हिला आहे. आफताब बऱ्याचवेळा त्यांचा निवांत वेळ घालवण्यासाठी गोव्यात येत असतो.

अभय देओलने देखील उत्तर गोव्यात एक सुंदर घर खरेदी केले आहे. अभय चित्रपटांच्या शुटींगमधून वेळ मिळाल्यानंतर गोव्यात येतो. त्याच्या घराच्या आजूबाजूला सुंदर हिरवळ असून, एक मोठा तलावही आहे.

Priyanka Chopra

प्रियांका चोप्रा जेव्हा जेव्हा भारतात येते तेव्हा गोव्यातच सुट्टी घालवण्यास तिला आवडते. प्रियांकाने बागा बीचजवळ एक सुंदर व्हिला खरेदी केला आहे. यापूर्वी परिणीती चोप्रानेही येथून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती 620 कोटी रुपये आहे आणि ती एका चित्रपटासाठी सुमारे 12 कोटी रुपये मानधन घेते.

अक्षय कुमारने ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत अनेकदा गोव्यात सुट्टी घालवली आहे. भारतातील हे त्याचे आवडते ठिकाण आहे आणि त्याला अनेकदा इथे यायला आवडते. गोव्यात त्यांचा पोर्तुगीज शैलीचा बंगला आहे. सी फेसिंग असलेले हे घर त्याने पाच कोटींना विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षय कुमारची एकूण संपत्ती 2414 कोटी रुपये आहे.

Akshay Kumar

आपल्या कॉमेडीने आणि सिरियस अभिनयाने बॉलिवूडमध्ये अर्शद वारसीने वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्शदने अलिकडेच गोव्यातील साळगाव येथे एक घर विकत घेतले आहे. पोर्तुगीज बनावटीच्या या घराच्या प्रेमात अर्शद आणि त्याची पत्नी मारीया पडले आहेत.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू युवराज सिंगचे देखी गोव्यात अलिशान घर आहे. युवराज अनेकवेळा या बंगल्यावर सुट्टी घालवण्यासाठी येत असतो. शिवाय मागील काही दिवसांपूर्वी त्याने हा बंगला भाड्याने देण्याचे ठरवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT