Bollywood Actor Anupam Kher In Goa Dainik Gomantak
गोवा

Watch Video: तुमच्या आनंदाचे रहस्य काय? गोव्यातील रस्त्यावर अनुपम खेर यांचा महिलेला प्रश्न, पाहा मजेशीर संवाद

गोव्यातील एका महिलेशी संवादाचा अनुपम खेर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Pramod Yadav

Bollywood Actor Anupam Kher In Goa Viral Video: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर त्यांच्या उत्साही आणि खेळकर स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतात. सामान्य लोकांशी तसेच, घरात आईशी केलेला संवाद ते नेहमी त्यांच्या सोशल मिडिया हँडलवर शेअर करत असतात. त्यांच्या अशा व्हिडिओंना उत्तम प्रतिसाद मिळत असतो.

खेर यांचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात खेर गोव्यातील एका मासळी विक्रेत्या महिलेशी मजेशीर संवाद साधताना दिसत आहेत.

खेर उत्तर गोव्यात प्रवास करत असताना डायस या मासळी विक्रेत्या महिलेशी ते रस्त्यावर संवाद साधतात. महिला नेहमीच आनंदी असते असे ती खेर यांना सांगते, त्यावर तुमच्या आनंदाचे रहस्य काय असा प्रतिप्रश्न खेर यांनी महिलेला केला.

मी कायम आनंदी असते कारण माझे कुटुंब नेहमी आनंदी असते असे उत्तर महिला देते आणि दोघेही खळखळून हसतात. दोघांमधील संवादाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

दोघांमधील संवादात पुढे आनंद हीच खरी श्रीमंती आहे. तुम्हाला काय वाटतं श्रीमंती म्हणजे काय? असा प्रश्न खेर तिला करतात. त्यावर महिला मी आनंदी आहे कारण मी कष्ट करते, हार्डवर्कवर माझा विश्वास आहे. मी माझ्या कुटुंबासाठी घर उभारलं आहे. अशी माहिती महिला देते.

अनुपम खेर यांनी डायस यांचे कौतुक करत आनंद हीच खरी श्रीमंती असल्याचे सांगितले. माणूस आनंदी असल्यावर काहीही करू शकतो असेही ते व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

महिलेचा पती आणि तीन मुले देखील आनंदी असून, आपण त्यांच्याकडून हे शिकायला हवं असा सल्ला खेर व्हिडिओच्या शेवटी देतात. त्यानंतर खेर यांनी महिलेसोबत फोटो काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT