Deadbody Dainik Gomantak
गोवा

मडगावात सुलभ शौचालयाजवळ आढळला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह

Margao News: संबधित व्यक्ती या परिसरात भंगार गोळा करण्याचे काम करत होता. तो मद्याच्या आहारी देखील गेल्याची माहिती तपासात समोर आली.

Pramod Yadav

मडगाव: रेल्वे स्थानक परिसरातील सुलभ शौचालयाजवळ ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानक रोडवर बुधवारी (१५ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजता त्याचा मृतदेह आढळला. हा व्यक्ती भंगार गोळा करण्याचे काम करतो व सातत्याने दारुच्या नशेत असतो, अशी माहिती समोर आली आहे.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांना एक फोन आला. रेल्वे स्थानक रोडवरील सुलभ शौचालयाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयाने व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, संबधित व्यक्ती या परिसरात भंगार गोळा करण्याचे काम करत होता. तो मद्याच्या आहारी देखील गेल्याची माहिती तपासात समोर आली.

मृत व्यक्तीचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय आणि कायदेशीर तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शुभम गावकर याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal Political Reservation: आदिवासी आरक्षणाचा तिढा वाढला! केंद्र सरकारच्या विलंबाने राज्यातील नेते संतापले; मोठ्या आंदोलनाचे संकेत

Horoscope 24 June 2026: कुबेराचा खजिना आणि बाप्पाची कृपा! बुधवार ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजे देश अस्थिर करणाऱ्यांची ‘बी-टीम’, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार!

Chandra Gochar 2026: मानसिक शांतता आणि ऐश्वर्याचा मिलाफ! 5 राशींना मिळणार बँक बॅलन्स वाढवण्याची सुवर्णसंधी; महालक्ष्मीची कृपा

ICC Womens T20 Ranking: 12 महिन्यांचा प्रवास अन् ऐतिहासिक शिखर! भारताची 21 वर्षीय एन श्री चरणी बनली जगातील नंबर-1 टी-20 गोलंदाज

SCROLL FOR NEXT