Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Mapusa Accident: दुःखद घटना! कार-दुचाकीची धडक; चालकाची हरपली शुद्ध; 3 दिवसांनी झाला मृत्यू

Bodgini Mapusa Accident: बोडगिणी येथे कारची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे रस्त्यावर कोसळून दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला व त्याची शुध्द हरपली.

Sameer Panditrao

म्हापसा: बोडगिणी - म्हापसा येथे कार आणि दुचाकी याच्यात झालेल्या अपघातातील गंभीर जखमी दुचाकीस्वार उमेश महेंद्र कुमार (वय ३८, रा. म्हापसा व मूळ दिल्ली) यांचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले.

सोमवारी (ता. २९) रात्री ११.१५ च्या सुमारास हा अपघात घडला होता. उमेश कुमार हा जीए ०३ एबी ३७०४ क्रमांकाच्या दुचाकीवरून मुख्य रस्त्यावर येत होता, तर जीए - ०७ - के - ६८८८ क्रमांकाच्या कारने जोयल टोनी रॉड्रिग्ज (रा. ताळगाव) हे म्हापशाहून पणजीच्या दिशेने जात होते.

यावेळी वाटेत बोडगिणी येथे कारची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे रस्त्यावर कोसळून दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला व त्याची शुध्द हरपली. जखमीला १०८ रुग्णवाहिकेतून प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर पुढील उपचारार्थ गोमेकॉत त्याला हलविण्यात आले. उपचार सुरू असताना बेशुध्दावस्थेतच त्याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला.

पोलिस हवालदार शिवाजी शेटकर यांच्या तक्रारीच्या आधारे या अपघातास कारणीभूत कारचालक जोयल रॉड्रिग्ज याच्याविरुध्द म्हापसा पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन हाकणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश पाळणी हे करीत आहेत.

दरम्यान, उमेश कुमार हा एसी मेकॅनिकचा व्यवसाय करत होता. पत्नी व मुलांसमवेत तो म्हापशात रहात होता. त्याच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पत्नी व मुलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GST Reforms From 1 November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार GST चे नियम! नोंदणी होणार सोपी, रिफंड मिळणार फास्ट; मोदी सरकारची व्यापाऱ्यांना दिवाळी भेट

Bomb Threat News: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

Ration Card New Rule: 14 कोटी रेशन कार्डधारकांसाठी खूशखबर! आता रेशनसोबत मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT