Bodgeshwar Jatra in Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

बोडगेश्‍‍वराचा शनिवारपासून जत्रोत्‍सव सुरु

विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल, मंदिर आणि परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण

दैनिक गोमन्तक

म्हापसा : येत्या शनिवार 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या म्हापसा येथील श्री बोडगेश्वर संस्थानच्‍या 87 व्‍या जत्रोत्सव व 29व्‍या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त मंदिराचे तसेच परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. उत्‍सवानिमित्त यंदा विविधांगी कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Bodgeshwar Jatra News Updates)

जत्रोत्सवासंदर्भातील आयोजन व्यवस्थेसंदर्भात माहिती देताना भाईडकर म्हणाले, यंदा दीपस्तंभाच्या परिसरात पीसीसी लाद्या घालण्यात आल्या आहेत. तसेच मंदिराच्या (Temple) पूर्व व पश्चिम बाजूंनी असलेल्या रस्त्यांचे हॉटमिक्स करण्यात आले आहे. त्या रस्त्यांवर ऑईल पेंटच्या साहाय्याने मार्किंग करण्यात आले असून, तिथे वाहनांच्या पार्किंगची चांगल्यापैकी सोय करण्यात आली आहे. शिवाय म्हापसा ते पणजी मार्गाच्या बाजूला मरड येथील शेतजमिनीच्या भागात तसेच म्हापसा (Mapusa) ते कळंगुट मार्गाच्या बाजूला मंदिराच्या डाव्या बाजूने असलेल्या शेतीत जत्रोत्सवानिमित्त अतिरिक्त पार्किंग व्यवस्था करण्यात येईल.

गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हा जत्रोत्सव प्लास्टिकमुक्त (Plastic) करण्याचा प्रयत्न करीत असलो तरी त्याबाबत अन्य कुणीही फारशी दखल घेतली नाही. केवळ म्हापसा पालिकेने त्याबाबत आम्हा देवस्थान पदाधिकाऱ्यांची प्रशंसा करून आवश्यक सहकार्यही वेळच्या वेळी दिलेले आहे, असे भाईडकर यांनी स्पष्ट केले. यंदा कोविडमुळे जत्रोत्सवानिमित्त मोजकेच स्टॉल्स विक्रेत्यांना उपलब्ध करून दिले जातील. विशेषत: खाजे व मिठाईचे स्टॉल्स व अन्य काही अत्यावश्यक स्टॉल्सना परवानगी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

यंदाच्या जत्रोत्सवानिमित्त 15 ते 22 जानेवारी असे आठ दिवस विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 रोजी वर्धापनदिन सोहळ्याच्या दिवशी सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी 1 वा महाप्रसाद, सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव, नंतर दारूकामाची आतषबाजी, 8.30 वाजता म्हापशातील ॐ सत्य साई सेवा मंडळातर्फे भजन व रात्री 9.30 वाजता ‘अजिंक्य तारा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग कुडाळ येथील कलेश्वर नाट्यमंडळातर्फे सादर केला जाईल. रविवार दि. 16 रोजी सायंकाळी 6 वाजता पांडुरंग राऊळ व सहकाऱ्यांचे भजन व रात्री 12 वाजता प्रवीण कळंगुटकर यांच्यातर्फे ‘कालचक्र’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होईल. 17 रोजी सकाळी 10 वाजता देवस्थानतर्फे श्री सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता मोहनदास पोळे व सहकारी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 18 ते 22 पर्यंत दररोज सकाळी 10 वाजता म्हापशातील विविध जनसमूहांतर्फे सत्यनारायण महापूजा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT