Boat Capsizes Fishermen Rescued Dainik Gomantak
गोवा

Boat Capsizes : कोलवा येथील समुद्रात १३ खलाशांना वाचविले

Boat Capsizes in Colva Beach : दुसऱ्या घटनेत आणखी एका होडीचे मोटर बंद पडल्‍याने होडीत पाणी भरू लागले. मात्र, खलाशांनीच सतर्कता दाखवून इतरांच्‍या साहाय्‍याने ही होडी किनाऱ्यावर आणल्‍याने मोठा अनर्थ टळला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, गोव्‍यात मासेमारीवर बंदी असतानाही आज सोलर सुंगटे पकडण्‍याच्‍या आशेने खवळलेल्‍या समुद्रात गेलेली एक बोट समुद्रात उलटल्‍याने १३ खलाशांचा जीव धोक्‍यात आला.

सुदैवाने किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेऊन सर्व खलाशांना वाचविले, तर अन्‍य एका घटनेत समुद्रात गेलेल्या होडीत पाणी भरू लागल्‍याने खलाशांची तारांबळ उडाली. मात्र, त्‍यांनीच समयसूचकता दाखवीत आपली होडी किनाऱ्यावर आणली.

कोलवा व बाणावली किनाऱ्यावरून ३२ मच्‍छीमार बोटी पाण्‍यात गेल्‍या होत्‍या. त्यापैकी ग्रीफन फर्नांडिस यांच्‍या मालकीची बोट समुद्रात उलटली. त्‍यावर काम करणारे सर्व खलाशी झारखंडमधील होते. समुद्रात आत शिरल्‍यावर एका लाटेच्‍या तडाख्‍यात ही बाेट

उलटली.

दुसऱ्या घटनेत आणखी एका होडीचे मोटर बंद पडल्‍याने होडीत पाणी भरू लागले. मात्र, खलाशांनीच सतर्कता दाखवून इतरांच्‍या साहाय्‍याने ही होडी किनाऱ्यावर आणल्‍याने मोठा अनर्थ टळला.

जीवरक्षक जखमी

समुद्रात बोट उलटल्याची घटना जीवरक्षकांच्‍या लक्षात आल्‍यावर त्‍यांनी तत्‍काळ मदतीसाठी धाव घेऊन त्‍यांना पाण्‍यातून बाहेर काढले. हे मदतकार्य करताना साईल तुळसकर हा जीवरक्षकही जखमी झाला. खलाशांसह त्यांना इस्‍पितळात दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT