Blue Bottle fish Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या किनाऱ्यांना ‘ब्ल्यू बॅटल’ चा धोका

ब्‍ल्‍यू बॅटल माशांच्या काट्यांमुळे त्वचेला जळजळ होऊन त्वचारोग होण्चीया शक्यता असते.

दैनिक गोमन्तक

पणजी: सध्या देशात सगळीकडे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा परिणाम काही प्रमाणात जलचर प्राण्यांवरही होतांना दिसतो आहे. कारण पुराचे पाणी गोव्यातील ग्रामीण भागात शिरल्याने नद्यातील मगरी आता लोकवस्तीत शिरायला लागल्याचे गोल्या काही दिवसात बघायला मिळाले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशातच गोवा (Goa) आणि मुंबईच्या (Mumbai) समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू बॅटल (Blue Battle) जेलीफीशचा (Fish) धोका असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जीवरक्षक संस्थेने केले आहे. या माशांच्या काट्यांमुळे त्वचेला जळजळ होऊन त्वचारोग होण्चीया शक्यता असते. विशेषतः ब्‍ल्‍यू बॅटल जेलीफीश हिंदी महासागरात मोठ्या प्रमाणात आढळतात. (Blue Bottle fish is threat on shores of Goa)

दरम्यान गोव्यात (Goa) अधिकृतरित्या मासेमारी 1 आगस्ट पासून सुरू होणार असली तरी लहान पडाव घेऊन मासेमारी करणे सुरूच आहे. काल अशाच एका पडावात बंपर कोळंबी (Kolambi Fish) जाळ्यात पडली आहे. काल सायंकाळी हा पडाव किनाऱ्याला लागल्यावर लोकांनी तिथे गर्दी केली होती. बऱ्याच दिवसांनंतर मनासारकी मासळी जाळ्यात सापडल्याचा आनंद खुशी मच्छिमाराच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मागच्या काही दिवस समुद्रात वादळी वारे असल्याने कुणी होड्या समुद्रात घातल्या नव्हत्या मात्र कालपासून समुद्र शांत झाल्याने आता होड्या पाण्यात उतरू लागल्या. सध्या गोव्यात यांत्रिकी होड्यांनी मासेमारी करण्यास बंदी असून 1 ऑगस्ट पासून ही बंदी उठणार आहे. मासेमारीवरील बंदी उठवण्यासाठी अजून दोन-चार दिवस बाकी असतानाच काल खारीवाडा मच्छीमारी मालकासाठी सुवर्ण दिवस ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT