Black Panther Goa Dainik Gomantak
गोवा

Black Panther: ब्लॅक पॅंथरची दहशत वाढली! पाळीव प्राण्याचा पाडला फडशा; नागरिकांत भीतीचे वातावरण

Black Panther Goa Borim: खाजोर्डा भागातील निलेश प्रभू बोरकर यांच्या पाळीव कुत्र्याचा तसेच मांजरीचा फडशा पाडल्याची घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

Sameer Panditrao

बोरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन ब्लॅक पॅंथरच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खाजोर्डा भागातील निलेश प्रभू बोरकर यांच्या पाळीव कुत्र्याचा तसेच मांजरीचा फडशा पाडल्याची घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

याशिवाय परिसरातील अनेक नागरिकांनी आपली कुत्री व मांजरे बेपत्ता झाल्याच्या तक्रारी केल्या असून, या घटनांमागे पॅंथरच असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मिरंगात–बोरी या अतिदुर्गम आणि दाट झुडपांनी व्यापलेल्या भागात दोन ब्लॅक पॅंथर फिरताना काही ग्रामस्थांनी पाहिले होते.

मिरंगातच्या डोंगराळ परिसरातून जाणारा बगलरस्ता बेतकी–बोरीपर्यंत जातो. या रस्त्यावरून फारशी वाहनांची ये-जा नसल्याने परिसर तुलनेने शांत आणि निर्मनुष्य असतो. त्यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तपणे वावरण्यास पोषक वातावरण मिळते. आता या पॅंथरनी आपला मोर्चा खाजोर्डा परिसराकडे वळविल्याचे दिसून येत आहे.

संध्याकाळनंतर नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, लहान मुलांना एकटे सोडू नये तसेच पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे. वाढत्या दहशतीमुळे वनखात्याने तात्काळ उपाययोजना करून बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

फोंडा वनविभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, वनअधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT