फोंडा: ‘सर्वांनी एकदिलाने काम करा, मडकई मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवा’, अशी साद भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना घातली. मांद्रेनंतर आता मडकई या मगोच्या बालेकिल्ल्यात आज भाजपचा मेळावा झाला.
दुर्भाट शारदा सभागृहात झालेल्या या मेळाव्याला भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना दामू नाईक यांनी ‘‘मडकई मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्ते युतीचा धर्म पाळत आहेत; मात्र मडकई काबीज करण्यासाठी ताकद एकवटावी’’ असे आवाहन केले. ‘आम्ही मोठ-मोठी भाषणे करतो, देश असा चालला पाहिजे. पण, हे कधी शक्य आहे? जेव्हा आपले सरकार अस्तित्वात असते. त्यासाठी चार विचारांचे चार लोक बरोबर घ्यावे लागतात, असे म्हणत दामू यांनी अप्रत्यक्षरीत्या आयात आमदारांबाबत समर्थन केले.
दुर्भाट येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मडकई भाजप मंडळाने काही मागण्या ठेवल्या आहेत, त्यात येत्या विधानसभा निवडणुकीत मगो आणि भाजपची युती झाली तर मडकई मतदारसंघ भाजपसाठी सोडा, अशी आग्रही मागणी प्रदीप शेट व इतरांनी केली आहे. अन्य काही मागण्याही यावेळी प्रदेशाध्यक्षांकडे मांडल्या.
मडकईत यावेळेला ३१ जणांची भाजप मंडळ समिती निवडण्यात आली आहे. यावेळेला प्रथमच एका महिलेला मंडळ अध्यक्षपद दिले असून सुरेखा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघातील विविध ठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांचा या समितीत समावेश आहे.
मडकई मतदारसंघावर जर भाजपचा झेंडा फडकावयाचा असेल तर एकजुटीने काम करा, निश्चितच यश मिळेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि सरकारने राबवलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवाव्यात, त्यासाठी झटून कार्य करावे,असेही दामू नाईक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.