Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Result: 150 पेक्षा अधिक पंचायतींत भाजपला स्पष्ट बहुमत; मुख्यमंत्री सावंत यांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील 186 पंचायतीसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान पार पडले. या सर्व पंचायतीचा निकाल आज (दि.12 ऑगस्ट) रोजी जाहीर करण्यात आला. 186 पैकी 150 पेक्षा अधिक पंचायतींत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. पंचायतीत विजयी झालेल्या उमेदवारांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले.

लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत निवडणूक महत्वाची आहे. आज निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन, त्यांनी लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिनी काम करावे. पंचायतीचा निकाल ग्रामीण भागात भाजपचा प्रभाव वाढत असल्याचे हे द्योतक आहे. 186 पैकी 150 पेक्षा अधिक पंचायतींत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच, उर्वरित पंचायतीत देखील 50 टक्क्यांहून अधिक उमेदवार भाजपचेच असल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकण्यावरून विरोधकांनी टिका केली या प्रश्नाला उत्तर देताना सावंत म्हणाले. निवडणूका पुढे गेल्या यासाठी पाऊस आणि ओबीसी आरक्षण ही दोन कारणे होती. निवडणूका वेळेवर घेण्याबाबत आम्हाला काहीही अडचण नव्हती असे सावंत म्हणाले. स्वयंपूर्ण गोवा ही मोहीम गावांगावत रूजत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावांत अंत्योदय योजना घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT