BJP will come to power with majority in Goa in 2022 state assembly elections Chief Minister Dr Pramod Sawant said 
गोवा

'गोव्यात 2022 मध्ये भाजप बहुमताने सत्तेत येणार' ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना विश्वास

गोन्तक वृत्तसंस्था

पणजी :  गोवा राज्याच्या २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश पाहता इतर कोणताही पक्ष त्याच्याजवळ जाऊ शकला नाही. त्यामुळे पक्ष विधानसभेत पूर्णपणे बहुमत मिळवेल, असा मला ठाम विश्‍वास आहे. भाजपविरुद्ध विधानसभा निवडणुकीत इतर पक्षांची युती झाली तरी त्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी मत व्यक्त केले.  


जिल्हा पंचायतीत ४८ पैकी ३३ जागा भाजपने जिंकल्या आहेत. यावरून राज्यातील जनतेला भाजप सरकारचे सुशासन व विकासात्मक अजेंडा आवडतो हे सिद्ध होते. राज्य सरकार आणि भाजप त्यांच्या हितासाठी काम करत आहे याची लोकांना खात्री पटली आहे. येणारे सरकारही पूर्ण बहुमताचे असेल आणि तेही भाजपचेच, असेही त्यांनी पुन्हा आत्मविश्‍वासाने नमूद केले आहे. येत्या दोन वर्षांत गोव्यात पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतील आणि अशा सुविधा देणाऱ्यांमध्ये देशात गोवा हे पहिले राज्य असेल. राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी युतीसाठी चालविलेल्या प्रयत्नावर सावंत म्हणाले की, दरवेळी असेच होते. भाजप एका बाजूला आणि इतरजण दुसऱ्या बाजूला असतात. अशा युतीचा भाजपवर काहीच परिणाम होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT