Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीसाठी भाजपने बैठकांच्या सत्रांना सुरूवात

Goa BJP: बैठकांचे सत्र : निवडणूक प्रभारी सूद गोव्‍यात

दैनिक गोमन्तक

Goa BJP: लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीसाठी भाजपने बैठकांचे सत्र सुरू केले आहे. राज्याचे निवडणूक प्रभारी आशिष सूद यांनी आज दिवसभर भाजपची गाभा समिती, मंत्री, पदाधिकारी आणि संबंधितांच्‍या बैठका घेतल्या.

उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता येथील इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आमदार, मंडळ समितीचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची ते बैठक घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे विमानतळावर तर मुख्यमंत्री केले.

तानावडे यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, निवडणूक प्रक्रियेतील निर्णय घेण्यासाठी निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात येते. आज व उद्या सूद गोव्यात असतील. दर पंधरा दिवसांनी ते लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी गोव्‍यात येणार आहेत. निवडणूक जवळ आल्यावर त्यांचा मुक्काम राज्यातच असेल. आज प्रामुख्याने त्यांनी कोणाकडे कोणती जबाबदारी आहे हे समजून घेतले.

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केंद्रीय पातळीवर ठरवलेल्या कार्यक्रमांची राज्य पातळीवर कशी अंमलबजावणी होते याची माहितीही त्यांनी करून घेतली.

गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्‍या दौऱ्याचा व उमेदवार निवड प्रक्रियेचा संबंध नाही. अद्याप राज्य निवडणूक समिती स्थापन व्हायची आहे. त्‍यानंतर विविध नावांचा विचार केला जाईल. ती नावे दिल्लीला पाठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक समिती छाननी करेल. भाजपची ही पद्धत आहे.
- सदानंद तानावडे, प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT