Goa Mining: शिरगावात साठवलेल्या खनिजाची मयेतून वाहतूक होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. मुळाक-खाजन शेतकरी संघटनेने अनिर्बंध खनिज वाहतुकीविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात चाललेली चालढकल पाहता खनिज वाहतूक करण्यास संबंधितांना रस नसावा असे दिसते.
विशेषतः सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर ग्रामस्थ ट्रकांच्या फेऱ्या मोजतील म्हणून खनिज वाहतूक केली जात नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शिरगाव येथे साठवलेले 23 हजार मेट्रिक टन खनिज ई-लिलाव पुकारून सरकारने विकले होते. मे. ब्लू ग्लोब एक्सपोर्टस्ने ते विकत घेतले. मयेतून या खनिजाची वाहतूक केल्याने हवा व ध्वनिप्रदूषण होते. दिवसरात्र खनिज वाहतूक केली जात असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या मुद्यावर न्यायालयाचे लक्ष वेधल्यावर हवेचे
प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवून तिचे मापन जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध करावे, दिवसा केवळ 50 ट्रक फेऱ्याच माराव्यात आणि सीसीटीव्ही बसवून त्यातील दृश्ये लोकांना पाहण्याची व्यवस्था करावी, अशा अटी न्यायालयाने घातल्या होत्या. या अटींची पूर्तता करूनच उर्वरीत 5 हजार 900 मेट्रिक टन खनिजाची वाहतूक करण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती.
पैरा व गावकरवाडा-मये येथे हवेचे प्रदूषण मोजणारी यंत्रणा पूर्वीपासूनच आहे. तेथील मापन पाहण्यासाठी डिजिटल फलकाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्याचा नियंत्रण कक्षही पंचायतीत सुरू करण्यात आलेला नाही.
अशी तिसरी यंत्रणा पंचायतीच्या नव्या इमारतीसमोर बसवण्यात आली आहे, मात्र ती कार्यान्वित करण्यात आलेली नाही. दोन सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन होते. त्यापैकी पैरा येथे एक बसवण्यात आला तर पंचायतीजवळ कोणत्या दिशेने तोंड करून सीसीटीव्ही बसवावा याविषयी एकमत झालेले नाही.
शिवाय सीसीटीव्हीतील चित्रीकरण पाहण्याची सोय करण्यात आलेले नाही. यातच खनिज वाहतुकीसाठी दिलेली परवानगी २६ जानेवारी रोजी संपली आहे. त्यामुळेच मयेतील खनिज वाहतूक सुरू होणार नाही असे ग्रामस्थांना वाटते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, २३ हजार मेट्रिक टन खनिजाची वाहतूक केली जाणार आहे. त्यापैकी आता केवळ ५ हजार ९०० मेट्रिक टनच खनिज वाहतूक करणे शिल्लक आहे असे जे सांगण्यात येतेय, ते चूक आहे. एका ट्रकात १० टन खनिज भरले आणि दिवसाला ५० फेऱ्या मारल्या तर हे खनिज बारा दिवसांत वाहून नेले जाऊ शकते. सीसीटीव्हींमुळे ग्रामस्थ ट्रक फेऱ्या मोजतील अशी भीती संबंधितांना वाटत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.