cm pramod sawant and nitin navin Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2027: 'मिशन गोवा'साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत रणनीतीवर शिक्कामोर्तब; विजयाची हॅट्ट्रिकसाठी 'जनसंपर्क पॅटर्न'

Goa Assembly Election 2027: गोव्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) कंबर कसली आहे.

Manish Jadhav

पणजी: गोव्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) कंबर कसली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (30 जानेवारी) गोव्यात पक्षाच्या महत्त्वाच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भाजपच्या पणजी येथील मुख्य कार्यालयात पार पडलेल्या समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी केवळ कार्यालयात न बसता 'जनसंपर्कावर' भर द्यावा, तसेच सरकारने केलेल्या विकासकामांची आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवावी, अशा स्पष्ट सूचना नितीन नवीन यांनी या बैठकीत दिल्या.

नितीन नवीन यांचे गोव्यात आगमन झाल्यानंतर त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले. भाजप कार्यालय असलेल्या इमारतीच्या परिसरात पक्षाचे झेंडे लावून संपूर्ण वातावरण 'भाजपमय' करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी खास मंच उभारण्यात आला होता, जिथे नवीन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करुन त्यांचा उत्साह वाढवला. यानंतर झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री रमेश तवडकर, मंत्री मावीन गुदिन्हो यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत केवळ संघटनात्मक बांधणीच नाही, तर विरोधकांच्या हालचालींना कसे प्रत्युत्तर द्यायचे, याचीही आखणी करण्यात आली.

विशेष म्हणजे, शनिवारी (31 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता ताळगाव येथील समाज सभागृहात भाजपचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून भाजप गोव्यात (Goa) अधिकृतरित्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे मानले जात आहे. सध्या गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे काँग्रेसने दिल्लीत रणनीतीसाठी बैठका घेतल्या आहेत, तर दुसरीकडे 'आप'चे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गोवा दौरा केला असून अरविंद केजरीवाल हे देखील राज्यात दाखल होत आहेत. विरोधक एकवटत असतानाच नितीन नवीन यांचा हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. आपल्या दौऱ्यात नवीन हे उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयांना भेटी देणार असून चिंबल येथे उभारल्या जाणाऱ्या पक्षाच्या नवीन भव्य इमारतीची पाहणी देखील करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' परदेशी सुंदरींचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

SCROLL FOR NEXT