AAP Dayanand Narvekar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: नार्वेकरांच्या माघारीमुळे पर्वरीतील समीकरणात बदल

भाजपच्या बंडखोरांची गोची : इतर पक्षांची कसोटी

दैनिक गोमन्तक

पर्वरी: माजी उपमुख्यमंत्री तथा माजी सभापती दयानंद नार्वेकर हे पर्वरीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार होते. पण त्यांनी कोविड संसर्गामुळे निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे पर्वरीतील राजकीय समीकरणात बदल झाला आहे. पर्वरीचे माजी आमदार रोहन खंवटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. हे कार्यकर्ते नार्वेकरांना पाठिंबा देत असल्याची माहिती मिळाली होती. वास्तविक काही महिन्यांपूर्वी नार्वेकरांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे पक्षाने हळदोणे व पर्वरी या दोन मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. (BJP politics In Goa For assembly election)

सध्या या मतदारसंघातून आपचे रितेश चोडणकर कॉंग्रेसचे Goa Congress विकास प्रभुदेसाई व तृणमूलचे संदीप वझरीकर हे निवडणूक लढवित आहेत. वझरीकर हे मूळ भाजपचे असल्यामुळे आता भाजपचे बंडखोर कार्यकर्ते हे वझरीकरांच्या पाठीशी राहतात की नाही, हे बघावे लागेल. रोहन खंवटे हे पर्वरीतून दोनवेळा निवडून आले आहेत. खरेतर 2012 साली जेव्हा पर्वरी मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हाचे खंवटे हे पहिले आमदार. त्यावेळी त्यांनी भाजपच्या गोविंद पर्वतकर यांना 910 मतांनी मात दिली होती. मात्र 2017 साली कॉंग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे खंवटे यांची आघाडी सात हजारांहून अधिक मतांची झाली होती. यातून दोन्ही वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या खंवटेनी या मतदारसंघातील Constituency आपली वैयक्तिक राजकीय शक्ती दाखवून दिली होती. आता यावेळी मात्र, ते भाजपचे अधिकृत उमेदवार असणार असून त्यांचा निकटचा विरोधक कोण असेल, हे सांगणे कठीण आहे. तरीसुध्दा नार्वेकर आता रिंगणात नसल्यामुळे वझरीकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी ठरू शकतात.

भाजपची छुपी बंडखोरी यातील एखाद्या पक्षाला ‘खुराक’ ठरू शकते. पर्वरीत पेन्ह द फ्रान्स सुकुर व साल्वोदर द मुंद या तीन ग्रामपंचायती येतात. पर्वरीत सध्या औद्योगिक आस्थापनेबरोबर सदनिका व बंगल्यांचे जाळे पसरले असल्यामुळे हा मतदारसंघ सध्या राज्यातील एक प्रमुख मतदारसंघ बनला आहे. या मतदारसंघाला खंवटेंच्या रुपाने थोडा काळ का होईना, पण मंत्रिपदही लाभले आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजप सत्तेवर आल्यास खंवटेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकते. तशा प्रकारचा प्रचारही सध्या सुरू आहे. पण खरेतर खंवटेंची भिस्त आहे ती वैयक्तिक मतांवर. मागच्या दोन्ही वेळी याच मतांनी त्यांना साथ दिली होती. आणि आताही हेच मतदार त्यांच्याबरोबर दिसताहेत. नार्वेकरांनी तर आपण कोणालाच पाठिंबा देणार नाही, असे सांगितले असून ‘तटस्थ’ भूमिकेत राहण्याचे संकेत दिले आहेत. इतर पक्षांचीही कसोटी लागणार असे दिसते आहे. भाजपमध्ये बंडखोरी असूनही आता रोहन खंवटे तिसऱ्यावेळी आपली ‘नाव’ पैलतीरी लावतात, की विरोधक त्यांची ‘नाव’ रोखतात,याचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळेल.

नार्वेकरनिष्ठांची भूमिका काय ?

माजी मंत्री दयानंद नार्वेकर स्वतः पर्वरीतून Porvorim निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. तसे त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविलेही होते. पण पक्षाने उमेदवारी रितेश चोडणकर यांना दिल्यामुळे नार्वेकर नाराज झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नार्वेकरांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी पर्वरीत आपले प्रचारकार्य सुरू केले होते. भाजपचे Goa BJP नाराज कार्यकर्ते अधिक नार्वेकरांचे पूर्वीचे कार्यकर्ते यांच्या जोरावर ते बाजी मारतील ,असे वाटत होते. पण कोविडचा संसर्ग झाल्यामुळे नार्वेकर उमेदवारी दाखल करू शकले नाहीत. आणि त्यामुळे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा ‘तारणहार’ हातातून निसटल्यासारखा झाला. आता हे कार्यकर्ते कोणाच्या पाठीशी राहतात, हे बघावे लागेल.

कॉंग्रेस,आपच्या मतांना खिंडार ?

कॉंग्रेसची या मतदारसंघात विशेष ताकद नसल्यामुळे ते किती प्रभाव पाडू शकतील, हे सांगणे कठीण आहे. 2017 साली कॉंग्रेसने दयानंद नार्वेकरांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी अपक्ष रोहन खंवटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन नार्वेकरांना बाजूला सारले. त्यामुळे पर्वरीतील कॉंग्रेसची राजकीय शक्ती अजून तरी योग्यरित्या प्रतीत झालेली नाही. आपबाबतही असेच म्हणता येईल. मागच्यावेळी आप रिंगणात होता. पण पर्वरीत या पक्षाच्या उमेदवाराला नगण्य मते मिळाली होती. यावेळी आप किती झेप घेतो, ते बघावे लागेल. मात्र आप, तृणमूल व कॉंग्रेस हे समान विचारसरणीचे पक्ष असल्यामुळे ते एकामेकांच्या मतांना खिंडार पाडू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT