SADANAND SHET TANAVADE Dainik Gomantak
गोवा

Sadanand Tanavade: लवकरच अध्यक्ष, उपाध्यक्ष्यांच्या नावावर शिक्कामोर्तब; जिल्हा पंचायतबाबत तानावडे यांची माहिती

Goa Zilla Panchayat: उत्तर गोव्याचे अध्यक्ष सिद्धेश नाईक, दक्षिण गोव्याच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उत्तर व दक्षिण गोवा अध्यक्षपदाच्या नावावर भाजप पक्ष संघटना ३० रोजी शिक्कामोर्तब करणार आहे. यासाठी सर्व संबंधितांची ३० रोजी बैठक बोलावल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

उत्तर गोव्याचे अध्यक्ष सिद्धेश नाईक, दक्षिण गोव्याच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. या पदांसाठी २ रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची सत्ता असल्याने ही निवडणूक बिनविरोध केली जाणार आहे. त्यासाठीची नावांची निश्चिती पक्षीय पातळीवर केली जाणार आहे. पुढील वर्षी जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होणार आहे. हे गृहित धरून या नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर गोव्याच्या जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांचे बंधू धाकू आणि भाजप संघटनेच्या कार्यात अग्रेसर असणारे गिरीश उस्कैकर यांच्या नावांवर पक्षीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण गोव्यात पंचायतमंत्री माविन गुदिन्होंच्या समर्थक अनिता थोरात आणि आदिवासी समाजातील संजना वेळीप यांच्या नावाची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT