Goa BJP News Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: गोवा भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीची होणार घोषणा! प्रदेशाध्यक्षांचे नाव अजून गुलदस्त्यात

Goa BJP leadership announcement: भाजपच्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदासाठी अनुक्रमे दयानंद कारबोटकर आणि प्रभाकर गावकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

Sameer Panditrao

Goa BJP Updates

पणजी: भाजपच्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदासाठी अनुक्रमे दयानंद कारबोटकर (मये) आणि प्रभाकर गावकर (केपे) यांचीच नावे आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. दोघांच्या निवडीची उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता घोषणा होणार आहे.

भाजपच्या कार्यालयात शुक्रवारी दोन्ही उमेदवारांनी आपला जिल्हाध्यक्षदाच्या निवडीचा अर्ज सादर केला. गोवा निवडणूक प्रमुख प्रेमानंद म्हांबरे, निवडणूक अधिकारी किशोर अस्नोडकर, केशव प्रभू, संजीव वेळीप यांची यावेळी उपस्थिती होती.

दोन्ही जिल्हाध्यक्षपदासाठी केवळ कारबोटकर आणि गावकर यांचेच अर्ज आले. त्यामुळे या दोघांच्या निवडीच्या नावाची अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या, शनिवारी होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष, मंत्री, पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार उपस्थित राहणार आहेत.

कारबोटकर यांच्या नावाची पहिली शिफारस पेडणे मंडळ अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, वाळपईचे मंडळ अध्यक्ष रामा राणूजी खरवत आणि म्हापशाचे मंडळ अध्यक्ष योगेश खेडेकर यांनी केली, तर दुसरी शिफारस हळदोणाचे मंडळ अध्यक्ष रणजीत उसगावकर, सांताक्रूझचे मंडळ अध्यक्ष संदेश शिरोडकर आणि साखळीचे मंडळ अध्यक्ष रामा नाईक यांनी केली. माहितीनुसार गोव्यात सव्वाचार लाख नव्या प्राथमिक सदस्यांची नोंदणी झाली आहे.

आता उत्सुकता प्रदेशाध्यक्ष निवडीची

कारबोटकर व गावकर यांनी मंडळ अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्याशिवाय पक्षाच्या सर्व कामांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आत्तापर्यंत भाजपने ३६ मंडळांच्या अध्यक्षांची निवड केली आहे. आता दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नरेंद्र सावईकर, दामू नाईक, दयानंद सोपटे, दिलीप परुळेकर, बाबू कवळेकर, दयानंद मांद्रेकर आणि गोविंद पर्वतकर यांची नावे प्रदेश भाजपकडून पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहेत आणि आता या सातपैकीच कोणाची निवड होतेय याकडे लक्ष लागले आहे. काही मंत्री व आमदारांनी पुन्हा सदानंद शेट तानावडे यांनाच पसंती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT