Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "पांडुरंग मडकईकरांचा 'तो' लाचखोरीचा आरोप खोटा, सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे इमानदारीने काम", खासदार अरुणसिंह यांचा निर्वाळा

Pandurang Madkaikar Bribery Allegations: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णत: इमानदारीने काम करत असल्याचा निर्वाळा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अरुणसिंह यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पांडुरंग मडकईकर यांनी लाचखोरीसंदर्भात केलेला आरोप खोटा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णत: इमानदारीने काम करत असल्याचा निर्वाळा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अरुणसिंह यांनी पत्रकार परिषदेत दिला.

खासदार अरुणसिंह म्हणाले, की देशातील प्रमुख राज्‍यांत संघटनात्मक काम पुढे गेले आहे. त्यात गोव्याचाही समावेश आहे. संघटनात्मक संरचना पूर्ण होत आली आहे. हे सारे वेगाने केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो.

कार्यकर्त्यांचा नवा संच सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलेल. पंतप्रधानांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. आजवर २१ देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार दिले आहेत. ते जगातील एकमेव नेते आहेत. पांडुरंग मडकईकर यांनी चुकीचा आरोप केला असून एका व्यक्तीच्या आरोपामुळे सरकारवर डाग लागत नाही.

जनतेला ठाऊक आहे, की सरकार इमानदार आहे. जनता वारंवार सरकार निवडून देते, याचा अर्थ सरकार इमानदार आहे. आम्ही जनतेसोबत आहोत. त्यांच्या आरोपात दम नाही. लोकशाहीत आपला मुद्दा जनतेसमोर ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, सार्वजनिकरित्या कोणते वक्तव्य करावे आणि कोणते करू नये, याचे तारतम्य प्रत्येकाने बाळगले पाहिजे.

प्रदेशाध्यक्षांची चर्चा करणार : मडकईकर : लाचखोरीच्या आरोपामुळे वादात सापडलेले माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याशी संपर्क साधला असता, आपण यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही. याबद्दल प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोप करणाऱ्यांचे काय करायचे? : पक्षात खल

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, माजी मंत्री कामासाठी पैसे दिल्याचा जाहीर आरोप करतो, तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न त्यांना केला असता अरुणसिंह म्हणाले, सर्वांना ठाऊक आहे, की त्यांनी केलेला आरोप खोटा आहे.

त्यांनी खुलेपणे खोटे वक्तव्य केले आहे. एका रुपयाचाही गैरव्यवहार झालेला नाही. असे आरोप करणाऱ्यांचे काय करायचे, यावर पक्षात विचार सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT