Film Shooting 
गोवा

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

IFFI Goa 2024: केवळ इफ्फीवेळी चित्रपट दाखवून चित्रपट निर्मात्यांना कोणताही फायदा होत नाही; काँग्रेस

Pramod Yadav

IFFI Goa 2024

पणजी: पुन्हा एकदा गोवा मनोरंजन संस्थेने इफ्फी-2024 साठी "गोवन डायरेक्टरर्स कट" हा नवीन विभाग जाहीर केला आहे. हा विभाग अधिकृत श्रेणीत आहे का आणि प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना गोवा फिल्म फायनान्स योजनेंतर्गत लाभ मिळेल का याचे मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील की गोवा चित्रपट निर्मात्यांना फसविण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे? असा सवाल, काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

गोवा मनोरंजन संस्थेने गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांच्या कोकणी आणि मराठी फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांसाठी "गोवन फिल्म विभाग" देखील जाहीर केला आहे. या चित्रपटांच्या निर्मात्यांना तसेच दिग्दर्शकांना सदर चित्रपटांच्या प्रदर्शनाने काय फायदे होतील, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

केवळ इफ्फीवेळी चित्रपट दाखवून चित्रपट निर्मात्यांना कोणताही फायदा होत नाही. सरकारने अधिकृत विभागात चित्रपट दाखवले पाहिजेत जे नंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट होतात, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर या चित्रपट महोत्सवाचे रूपांतर आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल मध्ये केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे इफ्फीबाबतचे विधान पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे मी मागच्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्ध केल्यानंतर सरकारला जाग आली, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

कॉंग्रेस पक्षाने मागणी केल्यानंतर आता गोवा फिल्म फायनान्स योजनेसाठी सरकारने अर्ज मागवले आहेत. २०१८ मध्ये तयार झालेल्या गोमंतकीय चित्रपटांचे प्रलंबित निधीचे वितरण तुम्ही केव्हा कराल? असा प्रश्न अमरनाथ पणजीकर यांना विचारला आहे.

भाजप सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले नाही. स्थानिक चित्रपट निर्मात्यांना नाऊमेद करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्य चित्रपट महोत्सव तातडीने आयोजित करावा, अशी आमची मागणी आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT