BJP Lok Sabha Campaigning In South Goa Twitter
गोवा

Pallavi Dempo: मडकईतून 90 टक्के मतदान द्या, पल्लवी धेंपेंना निवडून आणा; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

BJP Lok Sabha Campaigning In South Goa

मडकई मतदारसंघाने आतापर्यंत सिंह पाहिला आहे; पण आता लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना निवडून आणण्यासाठी कमळासोबत मगोची युती असल्याने यावेळेला मडकईतून भाजपला नव्वद टक्के मतदान द्या आणि पल्लवी धेंपे यांना निवडून आणा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मडकई मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (ता.२) या भागाचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केला.

त्यावेळेला त्यांनी मगो कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पल्लवी धेंपे यांनीही मगो कार्यकर्त्याशी संवाद साधताना यावेळेला विकासाला मतदान करा, असे आवाहन केले.

मडकई पंचायत सभागृहात झालेल्या या मेळाव्याला मुख्यमंत्री व वीजमंत्र्यांसोबत, उमेदवार पल्लवी धेंपे, मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, मडकई मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, गणपत नाईक, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, मगो पक्षाचे खजिनदार अनंत नाईक, प्रताप फडते, माजी सरपंच भोलू नाईक व मतदारसंघातील इतर सरपंच, आणि पंचसदस्य उपस्थित होते.

पल्लवी धेंपेंचे देवदर्शन

मडकई मतदारसंघातील दौऱ्यावेळी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत सुरवातीला नागेशी येथील देव नागेश, त्यानंतर बांदोडा येथील देवी महालक्ष्मी व नंतर मडकई येथील देवी नवदुर्गेचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'मडकई मतदारसंघात भाजप आणि मगो पक्षातील काही कार्यकर्त्यांत मतभेदही असतील; पण हे मतभेद विसरून मगो आणि भाजपच्या माध्यमातून निवडणुकीला उभ्या राहिलेल्या पल्लवी धेंपे यांना नव्वद टक्के मते देण्यासाठी मडकईवासीयांनी सिद्ध राहावे,' असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

'आपण १९९९ साली मडकईत सभा घेतली होती. त्यानंतर आजतागायत मडकईत मगो पक्षाची एकही जाहीर प्रचार सभा झाली नाही आणि आपण घरोघरी फिरून प्रचारही केला नाही. कारण मगो पक्षाचे कार्यकर्ते, मतदार आणि पंचायतींचे प्रतिनिधी यांनी आपल्यावर दाखवलेल्या प्रेमामुळेच आपण भरघोस मतांनी निवडून येत आहे,' असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT