Pallavi Dempo Dainik Gomantak
गोवा

BJP South Goa Loksabha Candidate: दक्षिण गोव्यात भाजपचा महिला उमेदवारच, आता 'हे' नाव आघाडीवर

BJP South Goa Loksabha Candidate: दक्षिणेत प्रखर हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, आता दक्षिणेत नवा चेहरा समोर आला आहे.

Pramod Yadav

BJP South Goa Loksabha Candidate

दक्षिण गोव्यात भाजपच्या लोकसभा उमेदवारीचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाही. भाजप दक्षिणेसाठी महिला उमेदवाराचा विचार करत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून समोर येत आहे. यासाठी गोव्यातून काही नावे देखील दिल्लीत पाठविण्यात आली.

यात प्रखर हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, आता दक्षिणेत नवा चेहरा समोर आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातून पल्लवी श्रीनिवास धेंपे यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीत धेंपे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपने धेंपो यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केला असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उत्तर गोव्याच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना पक्षाने विक्रमी सहाव्यांदा उमेदवारी देण्याची घोषणा केली, मात्र दक्षिणेत कोणाला संधी दिली जाणार याचा सस्पेंस कायम ठेवला. भाजपच्या दुसऱ्या यादीत देखील उरलेल्या एका उमेदवाराची घोषणा न झाल्याने दक्षिणेत भाजपचा चेहरा कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

२०२१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजप उमेदवार निवडीसाठी वेळ घेत आहे. सुरुवातील पाठवण्यात पुरुष इच्छुक उमेदवारांचा यादीवर वरिष्ठ समाधानी नसल्याने महिला उमेदवाराचा विचार केला जात आहे.

भाजपकडून महिलांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह इतर तीन ते चार नावांचा विचार करण्यात आला. यात प्रखर हिदुत्ववादी विचाराच्या शेफाली वैद्य यांचे नाव आघाडीवर होते. शेफली वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित होईल अशी शक्यता असताना भाजपकडून आता नवे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात भाजपच्या धक्कातंत्राची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, पल्लवी धेंपे यांच्या उमेदवारीबाबत त्यांचे पती श्रीनिवास धेंपे यांनी विचारले असता, अजून आपल्याकडे अधिकृत माहिती आलेली नाही. आपण या बातम्या पेपर मधूनच ऐकतोय असे धेंपे म्हणाले.

तसेच, पत्नी (पल्लवी) तिचा निर्णय स्वत: घेते. तिला काही ऑफिशियल कॉन्टॅक्ट झाला असेल तर त्याची माहिती त्यांच्याकडे नसल्याचा खुलासा श्रीनिवास धेंपे यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT