panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Panchayat Election : दक्षिण गोव्यातील ‘त्या’ सहा तालुक्यांवर भाजपचाच दबदबा

या निवडणुकीने काँग्रेसचे अस्तित्व केवळ सासष्टीतील काही भागापुरते राहिल्याचे दाखवून दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panchayat Election : सासष्टी तालुका वगळता दक्षिण गोव्यातील उर्वरित सहा तालुक्यांत सत्ताधारी भाजपचीच मक्तेदारी असल्याचे पंचायत निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. या पंचायतीवर भाजप समर्थन असलेली मंडळेच निवडून येणार असल्याचे स्पष्ट आहे. सत्ताधारी आमदारांनी आपली पत राखून ठेवली असून या निवडणुकीने काँग्रेसचे अस्तित्व केवळ सासष्टीतील काही भागापुरते राहिल्याचे दाखवून दिले.

सासष्टीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी काँग्रेसही फारशी चमक दाखवू शकली नाही. सासष्टी तालुक्यातील 33 पैकी चांदर, गिरदोळी आणि माखाझन या तीन पंचायतींवर काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचे पॅनल निवडून आले. तर वेळ्ळी पंचायतीवर काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांचे फक्त चार उमेदवाराच निवडून येऊ शकले. बेतालभाटी पंचायतीत मिकी पाशेको यांच्या पत्नी व्हियोला पाशेको पहिल्यांदाच निवडून आल्या तर नुवे पंचायतीतून माजी आमदार बाबाशान यांच्या पत्नी फ्रेडा डिसा या चौथ्यांदा निवडून आल्या. केपे मतदारसंघात काँग्रेसचे एल्टन डिकॉस्ता यांनी फक्त मोरपिर्ला आणि बाळ्ळी या दोन पंचायतींवर समाधान मानले.

मंत्र्यांचे गड शाबूत

मुरगाव तालुक्यात चिखली, बोगमाळोवर मंत्री माविन गुदिन्हो यांचे पूर्ण वर्चस्व राहिले. केपेतील शेल्डे व असोल्डा पंचायतीच नीलेश काब्राल यांनी राखून ठेवल्या. काणकोण तालुक्यावर सभापती रमेश तवडकर, सांगेत सुभाष फळदेसाई, धारबांदोडा येथे गणेश गावकर तर फोंड्यात रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, सुदिन ढवळीकर या चारही मंत्र्यांनी आपले गड शाबूत ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT