Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

भाजप सरकार आमचे फोन टॅप करतंय, गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

भाजपला विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्याचाही टोला

दैनिक गोमन्तक

पणजी : देशात सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपला पराभव दिसू लागलाय, त्यामुळे काँगेस नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत, असा गंभीर आरोप गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. एका खासगी संस्थेमार्फत काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप चोडणकरांनी केला आहे. (Girish Chodankar News Updates)

नुकताच मी एका तज्ज्ञाला भेटलो होतो, त्याने आम्हाला सांगितलं की आमचे सर्वांचे फोन टॅप होत आहेत. आम्हाला सरकारने उत्तर द्यावं की आमची परवानगी न घेता फोन टॅप कसे केले. आमच्या गोपनीयतेचं हे उल्लंघन आहे. फोन टॅपिंगमध्ये सहभागी अधिकाऱ्यांनी हे तात्काळ थांबवावं, असा इशारा गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी दिला आहे.

गोव्यातील भाजप सरकारचे दिवस संपलेत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी भाजपचं (BJP) ऐकू नये. आमचं सरकार आल्यावर आम्ही कडक कारवाई करु, असंही चोडणकर म्हणाले. आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत, तसंच अनेक अपक्षही आमच्या संपर्कात आहेत. पुन्हा भाजपचं सरकार येणार नाही, त्यामुळे ज्यांना सत्तेत यायचंय ते आमच्या संपर्कात आहेत असा दावाही काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT