Adv. yatish Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Sex Scandal: सेक्स स्कँडलप्रकरणी भाजपचा सावध पवित्रा

एका विद्यमान मंत्र्यावर सेक्स स्कँडलचा आरोप झाल्यानंतर याप्रकरणी सत्ताधारी भाजपने खूपच सावध पवित्रा घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

एका विद्यमान मंत्र्यावर सेक्स स्कँडलचा आरोप झाल्यानंतर याप्रकरणी सत्ताधारी भाजपने खूपच सावध पवित्रा घेतला आहे. निःपक्ष चौकशी व्हावी, असे भाजपला वाटत नाही का, अशी वारंवार विचारणा करूनही ठरवलेली दोन वाक्ये फेकण्यापलीकडे भाजपचे प्रवक्ते पुढे सरकलेच नाहीत.

पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते ॲड. यतीश नाईक म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तक्रार आल्यास चौकशी होईल, असे सांगितले आहे. कोणीतरी ‘ट्विट’ केले म्हणून त्याची दखल घ्यावीच असे नाही.

कथित सेक्स स्कँडल प्रकरणी कुणाचीही नाहक बदनामी नको!- मुख्यमंत्री

कथित सेक्स स्कँडलप्रकरणी कोणतीही तक्रार नसताना उगीच कोणाची नावे घेऊन बदनामी लोकांनी करू नये. कुणाच्‍या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करणे योग्य नाही. सोशल मीडियाचा गैरवापर केला जाऊ नये.

अशा प्रकारची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. ज्यांच्याविरुद्ध पोलिस स्थानकात तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

कोणीही सोशल मीडियाचा वापर करून वैयक्तिक जीवनामध्ये दखलअंदाज करू नये, असा सोशल मीडियावरील सगळ्यांना माझा सल्ला आहे. जर एखाद्याविरुद्ध तक्रार देण्यात आली असल्यास त्याची चौकशी व्हायला पाहिजे;

मात्र उगाचच एखाद्याला बदनाम करणे योग्य नाही. तसेच नको त्या प्रकरणात नाक खुपसण्याची गरज नाही. महिलांची अशा पद्धतीने केलेली बदनामी सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT