Congress Dainik Gomantak
गोवा

'काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपने गोव्यात तृणमूल काँग्रेस व ‘आप’ला आणले'

असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: अल्पसंख्याकांच्या समस्या सोडविण्यात भाजपला अपयश आले आहे. भाजपने गेल्या दहा वर्षात अल्पसंख्यांकासाठी काहीही केलेले नाही. काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपने गोव्यात तृणमूल काँग्रेस व ‘आप’ला आणले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी केला. राज्यात अल्पसंख्यांक आयोगाची गरज आहे. काँग्रेस (Congress) सत्तेवर आल्यावर हा आयोग स्थापन करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. (BJP has brought TMC and AAP in Goa to beat Congress)

पणजी (Panaji) काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रतापगढी यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नझीर खान, फिरोज खान व इर्फान उपस्थित होते. प्रतापगढी म्हणाले, अजूनही मडगावातील कब्रस्तानचा प्रश्‍न भाजपने सोडवलेला नाही. हे सरकार सपयशी अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले.

प्रलंबित प्रश्न सोडवू

राज्यातील कब्रस्तानचे प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. अल्पसंख्याक आयोग स्थापन करणे याही समस्या सोडवायला हव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजप सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. आम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. ते नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे प्रतापगढी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT