Bjp Goa Dainik Gomantak
गोवा

'त्यामुळं गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येणार'

उर्वरित सहा उमेदवार लवकरच घोषित होणार

दैनिक गोमन्तक

पणजी : भारतीय जनता पक्षाचे 40 पैकी 34 उमेदवार आज दिल्ली येथून जाहीर झाले आहेत. गोव्यामध्ये स्थिर आणि विकासाचे सरकार गेली बारा वर्षे भाजपाने दिले. पुढील पाच वर्षे समृद्धीचे सरकार देण्यासाठी भाजपने घोषित केलेल्या उमेदवारांच्या मागे भाजपच्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी आणि मतदारांनी उभे राहावे. आणि पुन्हा एकदा भाजपाचे (BJP) सरकार गोव्यात आणावे. असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व खासदार नरेंद्र सावईकर यांनी आज केले.

पणजी येथील भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सावईकर बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. यावेळी बोलताना सावईकर म्हणाले की गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येणार यात तिळमात्र शंका नाही. गेली दहा वर्षे भाजपाच्या गोवा (Goa) सरकारने केलेला विकास आणि केंद्रामधील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेला देशाचा विकास पाहून यावेळीही पुन्हा एकदा भाजपालाच लोक मते देतील असेही या प्रसंगी सावईकर म्हणाले.

भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने सर्वांशी विचारविनिमय करून व विविध स्तरावर अभ्यास करून भाजपाचे 34 उमेदवार घोषित केलेले आहेत. उर्वरित सहा उमेदवार लवकरच घोषित होतील. असे सांगून भाजपने ज्यांना उमेदवारी दिली आहे ती पूर्ण विचार करून आणि गोव्याच्या विकासाचे ध्येय ठेवून दिलेली आहे. त्यामुळे पक्ष ज्यांना उमेदवारी देतो त्यामागे उभे राहणे हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य ठरते. असे सांगून मतदारांनी भाजपच्या सरकारसाठी आणि केंद्र व राज्याच्या डबल इंजिन सरकारद्वारे गोव्याचा विकास व्हावा यासाठी पुन्हा एकदा भाजपाला मतदान करावे. असेही त्या प्रसंगी सावईकर म्हणाले.

माजी संरक्षण मंत्री व माजी मुख्यमंत्री (CM) मनोहर पर्रीकर त्यांचे योगदान भाजपाच्या वाढीसाठी मोठे आहे. त्यांनी भाजपला गोव्यामध्ये स्थान प्राप्त करून दिले आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने भाजपा मार्गक्रमण करत असल्याचे सांगून त्यांच्या पुत्राच्या उमेदवारीबाबत संसदीय मंडळाने जो निर्णय घेतला आहे तो प्रदेश भाजप मान्य करत असल्याचेही यावेळी एका प्रश्नावर बोलताना सावईकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT