Damu Naik, B L Santosh Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दामू नाईक - संतोष यांची विमानतळावर भेट! रात्री उशिरापर्यंत खलबते; राजकीय वर्तुळात खमंग चर्चा

Damu Naik B L Santosh Visit: बी. एल. संतोष हे उत्तर कर्नाटकातील एका संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने हवाई मार्गाने गोव्यात आले. या भेटीदरम्यान ते दोघेच असल्याने मनमोकळी चर्चा झाल्याचे मानले जात आहे.

Sameer Panditrao

पणजी: कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याविषयी दिल्लीत अहवाल पाठवल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांना राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना विमानातळावर का होईना भेटता आले.

दिल्लीतील दौऱ्यात दोन दिवसांत ही भेट त्यांना घेणे शक्य झाले नव्हते. संतोष हे कारवारला जाण्यासाठी गोव्यात विमानाने दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी पोचलेल्या दामू नाईक यांना त्यांच्याशी राजकीय घडामोडी आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल याविषयी सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली. या भेटीदरम्यान ते दोघेच असल्याने मनमोकळी चर्चा झाल्याचे मानले जात आहे.

बी. एल. संतोष हे उत्तर कर्नाटकातील एका संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने हवाई मार्गाने गोव्यात आले. विमानतळावरील अतिमहनीय व्यक्तींसाठी असलेल्या कक्षात भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक हे त्यांचे स्वागत करण्यासाठी पोचले. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी तेथेच बराच वेळ चर्चा सुरू केल्याने त्याचा संबंध संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाशी लावला जाऊ लागला आहे. या भेटीनंतर संतोष हे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार कारवार येथे रवाना झाले.

दामू नाईक यांच्‍याकडून मंत्र्यांची झाडाझडती

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकंदर राजकीय कारभाराविषयी अहवाल त्‍यांनी सादर केला होता. त्यानंतर संतोष गोवा दौऱ्यावर आल्‍यानंतर त्यांना प्रत्येक मंत्री, आमदाराचे संघटनेच्या दृष्‍टिकोनातून प्रगतिपुस्तक सादर केले होते. त्यानंतर मासिक अहवालात सर्व काही सविस्तरपणे नोंद करणे त्यांनी सुरू केले होते. त्यामुळे राज्यात राजकीय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे मत दिल्लीच्या पातळीवर तयार झाले आहे.

३ जूनच्‍या बैठकीत झाला उहापोह

दिल्लीत निवडक भाजप नेत्यांनी ३ जून रोजी घेतलेल्या बैठकीत गोव्यातील सरकारच्या कारभाराविषयीही चर्चा केली होती. मंत्रिमंडळ फेरबदल करण्यासाठी कोणती पावले उचलावीत, याबाबत मुख्यमंत्र्यांचे म्हणणे काय आहे, प्रदेशाध्यक्षांना काय वाटते, २०२७च्या विधानसभा निवडणुकीआधी कोणते नेते पक्ष सोडू शकतात, आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोणाला मंत्रिपद देणे आवश्यक आहे याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर कारवार येथे जाण्यासाठी का असेना, बी. एल. संतोष राज्यात आल्याने राजकीय चर्चेने पुन्‍हा उसळी घेतली आहे.

राजकीय स्थित्यंतराकडे लक्ष...

राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी आणि एकंदर राजकीय घडामोडींविषयी ३ जून रोजी दिल्लीत निवडक नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती प्रदेश पातळीवर देण्याची जबाबदारी बी. एल. संतोष यांच्यावर दिल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने ४ जून रोजीच्या अंकात दिले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व संतोष यांची ही भेट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

Man Kills Wife: तलवारीने केला हल्ला, डिचोलीत पतीकडून पत्नीची हत्या

Goa Assembly Session Live: स्थानिकांना डावलणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा... आमदार चंद्रकांत शेट्ये यांची मागणी

Karun Nair: लहान मुलासारखा रडला करुण नायर, केएल राहुलने दिला आधार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल; नेमकं काय झालं?

Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याचा मार्ग मोकळा; गोवा मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

SCROLL FOR NEXT