Damu Naik, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Breaking News: गोव्यात निम्मे मंत्रिमंडळ बदलणार? अनेकांचे धाबे दणाणले; हालचालींना वेग

Goa Cabinet Reshuffle: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘पक्षश्रेष्ठींनी या विषयावर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे दिल्लीत असलेले प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: भाजप पक्षश्रेष्ठींनी एकंदर मंत्रिमंडळाच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेणे सुरू केले आहे. त्यामुळे निम्मे मंत्रिमंडळ बदलले जाऊ शकते, या शक्यतेने भाजपमधील अनेकजण धास्तावले, भांबावले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘पक्षश्रेष्ठींनी या विषयावर शुक्रवारी (३० मे) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे दिल्लीत असलेले प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. पुढे कशी राजकीय पावले टाकण्यात येत आहेत, याची कल्पना पक्षश्रेष्‍ठींनी या दोन्ही नेत्यांना दिली आहे. मात्र, ती पावले कोणती, याची नेमकी माहिती उघड केलेली नाही.

त्यामुळे सारेजण घाबरलेले आहेत.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कानपूर, तर गृहमंत्री अमित शहा हे पुंछच्या दौऱ्यावर असल्याने प्रदेशाध्यक्षांची त्यांच्याशी थेट भेट होऊ शकलेली नाही. संघटनेच्या पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी दामू यांनी चर्चा केली आहे.

‘उटा’च्या सभेची गाज दिल्लीपर्यंत

१ फर्मागुढीतील‘उटा’च्या सभेची गाजही दिल्लीपर्यंत पोचली आहे. शिस्तप्रिय भाजपला अशाप्रकारे कोणी वेठीस धरू पाहात असेल तर त्याची गय केली जाऊ नये, असे मत दिल्लीत तयार झाले आहे.

२ आणखी काही घटक आसपास वावरत असतील ते पहा आणि कळवा, असा निरोप घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या यंत्रणेला दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलात अशा बेशिस्त मंत्र्यांना खुर्ची गमवावी लागू शकते.

दिल्लीतील घडामोडींमुळे अनेकांना धक्के

एकदा मंत्रिमंडळात समावेश झाला, की मुख्यमंत्र्यांची मर्जी असेपर्यंत मंत्रिमंडळातील स्थान पक्के, असे समजणाऱ्यांना दिल्लीतील घडामोडी समजू लागल्यानंतर धक्के बसू लागले आहेत. कामगिरीचा आढावा पक्ष संघटना घेते आणि कोणाला मंत्रिमंडळातून काढावे याचा निर्णय पक्ष घेणार, हे समजल्यानंतर काहीजणांचा ताण वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

SCROLL FOR NEXT