Anjuna Illegal Construction | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपने दिली शेतकऱ्यांना कमाल आधारभूत किंमत

Goa Politics: मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन: कुंभारजुवेत ‘कृषी सेतू’चे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Goa Politics: 2014 पासून भाजप सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांना कमाल आधारभूत किमतीसह विविध योजनांच्या माध्यमातून अनेक लाभ मिळाले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कुंभारजुवे येथे ‘कृषी सेतू’च्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, सरपंच नंदकुमार शेट, गावातील शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.

‘कृषी सेतू’चा फायदा कुंभारजुवे येथील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर शेतात नेण्यासाठी होणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांची साक्ष हा पूल आहे.

भाजप सरकारच्या काळात गोव्यात अटल सेतू, ज्ञान सेतू, योग सेतू आणि आता कृषी सेतू असे चार सेतू निर्माण झाले.

शेतकऱ्यांनी तीन कोटी रुपयांचे उत्पन्न घरी आणले, तरच या पुलाचा खर्च वसूल होईल. शेतकऱ्यांनीही बहुविध पिकांच्या शेतीत सहभागी व्हावे, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

कुंभारजुवे मतदारसंघातील विविध विकासकामांना मंजुरी दिल्याबद्दल आमदार राजेश फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

तीन कोटींचा कृषी पूल

गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) ३ कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधला आहे. त्याची लांबी ५० मीटर आणि रुंदी ३.५ मीटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT