Pernem | Babu Azgaonkar  Dainik Gomantak
गोवा

Pernem: यापुढे पेडण्यात निवडणुकीत 'त्याग' करणार नाही! बाबू आजगावकरांनी ठोकला शड्डू

पक्षामुळे नाही स्वतःमुळे निवडून आल्याचे मत; भाजपच्याच आजी-माजी आमदारांत होणार संघर्ष ?

Akshay Nirmale

Babu Azgaonkar on Pernem Seat: पेडणे हा माझा परंपरागत मतदारसंघ असून येथून मी चार वेळा निवडून आलो आहे. पक्षासाठी हा मतदारसंघ सोडला पण यापुढे असे करणार नाही. पेडण्यातून निवडणूक लढवणार असा निर्धार माजी आमदार आणि भाजप नेते बाबू आजगावकर यांनी व्यक्त केला आहे.

गतवर्षीच गोवा विधानसभेची निवडणूक झाली आहे. त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीचा अद्याप बराच अवकाश आहे. पण आत्ताच पेडण्यातून भाजप नेते बाबू आजगावकर यांनी शड्डू ठोकला आहे. त्यांनी निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे.

बाबू आजगावकर म्हणाले की, पेडणे हा माझा मतदारसंघ आहे. मी या मतदारसंघातून चार वेळा निवडून आलो आहे. आणि मी निवडून आलो आहे ते पक्षामुळे नाही तर बाबू आजगावकर या नावामुळे. मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाचा त्याग केला.

पण, यापुढे हा त्याग करणार नाही. पेडणे ही माझी कर्मभुमी आहे. आणि मी पेडण्यातून निवडणूक लढवणार आहे, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.

प्रवीण आर्लेकर हे पेडण्याचे विद्यमान आमदार आहेत. ते देखील भाजपमध्येच आहेत. त्यामुळे आता येथे आगामी काळात भाजपच्याच आजी-माजी आमदारांत संघर्ष पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT