Goa Loksabha Election 2024 | Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha BJP Candidate: श्रीपाद भाऊच उत्तर गोव्यातून भाजपचे अधिकृत उमेदवार, सलग सहाव्यांदा उमेदवारी

Goa Loksabha Election:भाजपच्या वतीने 16 राज्यातील 195 नावांची यादी जाहीर करण्यात आली.

Pramod Yadav

Shripad Naik BJP Candidate For North Goa

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने 16 राज्यातील 195 नावांची यादी जाहीर करण्यात आली.

यावेळी उत्तर गोव्यातून भाजपने विद्यमान खासदार श्रीपाद नाईक (MP Shripad Naik) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. दिल्लीत श्रीपाद नाईक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दिल्लीत सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या 195 जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात 28 महिला, 47 युवा, 27 एसटी, 18 एससी आणि ओबीसीच्या 57 जागांचा समावेश आहे.

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी लढणार निवडणूक लढवतील. पहिल्या 195 जणांच्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांचा समावेश असून, यात लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्लां यांच्या नावाचा समावेश आहे.

सोपटे, मांद्रेकर, परुळेकर यांचा पत्ता कट

लोकसभेच्या दोन जागांसाठी मागील तीन ते चार दिवसांपासून दिल्लीत खलबंत सुरु होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक दिवसांपूर्वी पहिल्या यादीत केवळ उत्तर गोवा जागेच्या उमेदवारीची घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

यानंतर विद्यामान खासदार श्रीपाद नाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती पण, दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर आणि दिलीप परुळेकर यांची नावे देखील चर्चेत होती. पण, दिल्लीत झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. यामुळे सोपटे, मांद्रेकर आणि परुळेकर यांचा पत्ता कट झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT