साखळी पालिकेत गेले कित्येक महिने भाजपची (BJP) लुडबूड  Dainik Gomantak
गोवा

Goa: साखळीमध्ये भाजपची दांडगाई

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर अपात्रतेचा प्रहार, काँग्रेसची कठोर टीका, साखळी (Sakhali) पालिकेत गेले कित्येक महिने भाजपची (BJP) लुडबूड सुरू असून येथे भाजपचा थेट हस्तक्षेप सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: साखळीचे (Sakhali) नगराध्यक्ष राया पार्सेकर (Raya Parsekar) आणि उपनगराध्यक्ष राजेश सावळ (Rajesh Sawal) यांना सरकारने विधानसभेचे अधिवेशन चालू असतानाच अपात्र ठरविल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजप (BJP) गटाला साखळी पालिकेत बहुमत मिळवून देण्यासाठी हा डाव खेळल्याचा आरोप साखळीतील कॉंग्रेस (Congress) गटाने केला आहे.

साखळी पालिकेत गेले कित्येक महिने भाजपची लुडबूड सुरू असून येथे भाजपचा थेट हस्तक्षेप सुरू आहे. परंतु न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला असल्याने आम्ही कुणाची पर्वा करीत नाही, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

साखळीतील सत्ताधारी गटाचे वकील सरेश लोटलीकर यांनी सांगितले, अपात्रतेमागे राजकारण असल्याचा दावा केला आहे. ‘आम्ही उच्च न्यायालयात निश्चितच जाणार आहोत आणि उच्च न्यायालयाने याबाबत हस्तक्षेपाची दखल घेऊन आम्हाला दिलासाही दिला आहे. असे एकतर्फी निर्णय 15 दिवस कार्यवाहीत येत नाहीत, असे ते म्हणाले.

पालिका कायद्यानुसार, पालिकेला आर्थिकदृष्ट्या नुकसानीत नेणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु विद्यमान प्रकरणात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी पालिकेचे नुकसान केलेले नाही. त्यांना खोट्या आरोपाखाली अपात्र ठरवता येत नाही, अशी माहिती ॲड. सरेश लोटलीकर यांनी दिली.

यापूर्वी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी अशाच प्रकरणात दिलेला निर्णय चुकीचा होता. त्यामुळे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले होते. परंतु मिलिंद नाईक यांनी बाजूला राहून आता वरील अपात्रता निर्णय पालिका अधिकारिणीचा भाग म्हणून वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिला आहे. परंतु अशा तऱ्हेचा अपात्रता निर्णय म्हणजेच एक निव्वळ विनोद आहे. आम्हाला अपात्रता निर्णयापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नाही व वरील निर्णय घाईघाईत घेतला आहे.

- ॲड. सरेश लोटलीकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT