BITS Pilani Student Suicide Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani Student Suicide: आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह वडिलांनी घेतला ताब्यात, केरळमध्ये होणार अंत्यसंस्कार; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

BITS Pilani Goa news: गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अर्जुन साबू (वय २६) या बिट्‍स पिलानीत पीएचडी करणाऱ्या केरळच्या विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या वडिलांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अर्जुन साबू (वय २६) या बिट्‍स पिलानीत पीएचडी करणाऱ्या केरळच्या विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या वडिलांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतला. त्याच्यावर केरळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले. अर्जुन साबू हा बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. तो बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये न राहता काही अंतरावरील एका इमारतीत भाड्याने राहत होता.

सुरवातीला काही दिवस तो कॅम्पसमध्ये राहत होता, पंरतु त्यानंतर तो एका इमारतीतील तीन बेडरूम असलेल्या फ्लॅटमधील एका बेडरूममध्ये राहत होता. तेथे घरकाम करण्यासाठी एक महिला येत असे. अर्जुन याने आपल्या खोलीत मंगळवारी रात्री किंवा बुधवारी मध्यरात्री गळफास घेतला असावा.

बुधवारी (ता. १३) सकाळी अकराच्या दरम्यान ही काम करणारी महिला तेथे आली असता तिला त्या फ्लॅटचे दरवाजा बंद असल्याचे दिसले. त्यामुळे तिने आपल्याकडील चावीने दार उघडले असता, अर्जुन याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

या प्रकरणी तिने शेजाऱ्यांना माहिती दिल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी अर्जुनच्या मृत्युप्रकरणी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सासाठी पाठविला.

अर्जुन हा हुशार विद्यार्थी होता. त्याने मानसिक तणावाखाली की आणखी दुसऱ्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आत्महत्येबद्दल उलटसुलट चर्चा

या आत्महत्येमुळे बिट्स पिलानी कॅम्पसचे व्यवस्थापन व शिक्षक वर्गही गोंधळून गेले आहेत. यापूर्वी त्या कॅम्पसमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तथापी, अर्जुनची गोष्ट वेगळी आहे. तो जरी बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाचा अभ्यास करीत असला, तरी तो सज्ञान व पदवीधर असल्याने त्याच्यावर अभ्यासाचा कोणताही ताण नसावा. मग त्याने आत्महत्या का केली याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT