BITS Pilani Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; उलटीत सापडले तीन प्रकारचे ड्रग्ज, घटनेचे गूढ वाढले

BITS Pilani Student Death Case: नायरच्या उलटीत ड्रग्ज आढळून आल्याने आता बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये ड्रग्ज पोहोचवले जात होते, हा संशय बळावला आहे.

Pramod Yadav

वास्को: बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणाचा गूढ अधिक वाढले आहे. ऋषी नायर याच्या उत्तरीय तपासणीतून धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीमुळे घटनेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ऋषीच्या उलटीत तीन प्रकारचे ड्रग्ज सापडल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.

ऋषी नायर (२०) या मूळ बंगळुरू येथील विद्यार्थ्यांचा बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणामुळे गोव्यासह देशभरात खळबळ निर्माण झाली होती. नऊ महिन्यात पाच विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये जीवन संपवल्याने ही घटना अधिक गंभीर मानली जात होती. नायरने आत्महत्या केल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला तर, तो मानसिक तणावाखाली असल्याचा देखील निष्कर्ष काढला जात होता.

दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. या तपासणीचा अहवाल आता समोर आला असून, यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऋषी नायरच्या उलटीत तीन प्रकारच्या अमली पदार्थाचा अंशा आढळून आला आहे. नायरच्या उलटीत ओल्पिडेम (ZOLP), मेथापेटामाईन (MAMP) आणि एमडीएमए असे तीन प्रकारचे ड्रग्ज आढळून आले आहेत. नायरने केलेल्या उलटीची तपासणी गोमेकॉतील रॅन्डॉक्स मशीनद्वारे करण्यात आली आहे.

नायरच्या उलटीत ड्रग्ज आढळून आल्याने आता बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये ड्रग्ज पोहोचवले जात होते, हा संशय बळावला आहे. यापूर्वी कॅम्पसमध्ये सिगारेट देखील पोहोचवले जात होते अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, प्रशासनाने याबाबत शक्यता नाकारली होती. दरम्यान, नायरच्या उलटीत सापडलेल्या ड्रग्जच्या अंशामुळे हा संशय बळावला आहे.

ऋषी नायर त्याच्या मूळ गावी असताना तो एक मुलीच्या प्रेमात होता. दरम्यान, त्याच्या या प्रेयसीने अचानाक जीवन संपविल्याने ऋषी मानसिक तणावाखाली होता. या काळात त्याला कॅम्पसमध्ये मानसिक समुपदेशन किंवा तत्सम प्रकारची मदत न मिळाल्याचे देखील सांगितले जाते. आता नायरच्या अहवालातून समोर आलेल्या नव्या माहितीमुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT