Bicholim Dainik Gomantak
गोवा

Mayem: मयेत गव्यांचा धुमाकूळ! वायंगण शेतीची नासधूस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Bison In Mayem: डिचोली शहरातील मये भागात गव्यांचा संचार वाढल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Sameer Amunekar

डिचोली: मये भागात लोकवस्तीजवळ गव्यांचा संचार वाढल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात वारंवार गव्यांचा वावर दिसून येत आहे. वायंगण भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी आणि बागायतदार यामुळे चिंतेत आहेत.​

मये भागात गव्यांचा संचार अधिकच वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गवे घरांच्या जवळपास फिरतानाच्या घटनाही समोर आल्या होत्या. यामुळे नागरिक भयभीत झाले असून, रात्री उशिरा घराबाहेर पडणं टाळत आहेत.

गव्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व बागायतदारांचं आर्थिक नुकसान झालं आहे. केळी, भाजीपाला यासारखी पिके गव्यांनी उद्ध्वस्त केली आहेत. काही ठिकाणी गवे झाडंही तोडून टाकत असल्यानं झाडांचं मोठं नुकसान झालं आहे.

मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर वायंगण शेती केली जाते, परंतु वारंवार होणाऱ्या गव्यांच्या हल्ल्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहन पार्किंगचे दर वाढले!

Purple Fest: आमीरसोबत 'सितारे जमीन पर'ची टीम येणार गोव्यात? कलाकारांना केले आवाहन; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

'गुंड निर्धास्‍त आणि सामान्‍य जनता घाबरली आहे'! सरदेसाईंचे टीकास्त्र; काणकोणकर हल्‍लाप्रकरणी सूत्रधाराचे नाव जाहीर करण्याची मागणी

Chimbel: 'सरकारने हट्टाला पेटू नये, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये', चिंबलवासीय लढ्याच्या तयारीत; युनिटी मॉलला कडाडून विरोध

Thimmappiah Tournament: ..पुन्हा तेंडुलकरने सावरले! गोव्याच्या फलंदाजांची घसरगुंडी; द्विशतकी आघाडीमुळे स्थिती भक्कम

SCROLL FOR NEXT