Mormugao Port Authority Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

Mormugao Port Authority: काही कंपन्यांनी बंदर प्राधिकरणाकडे आमदार संकल्प आमोणकर यांच्याकडून बंदरातील कामकाजात हस्तक्षेप होत असल्याची तक्रार केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao Port Authority

मुरगाव बंदरावर भाजपचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केलेल्या कथित राजकीय हस्तक्षेपामुळे आता आदित्य बिर्ला ग्रुपने महाराष्ट्रातील जयगड बंदरावर बॉक्साईट हाताळणीचे कामकाज स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने मुरगाव बंदराला आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपची सुमारे 1.7 लाख टन बॉक्साईटची नवी खेप थेट जयगड बंदराकडे वळविण्याच्या निर्णयामुळे केवळ मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या महसुलावर पाणी सोडावे लागलेले नाही, तर अनेक बार्जमालकांसह गोव्यातील स्थानिक व्यावसायिकांचेही नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले.

मुरगाव बंदरात काम करणाऱ्या काही कंपन्यांनी बंदर प्राधिकरणाकडे आमदार संकल्प आमोणकर यांच्याकडून बंदरातील कामकाजात हस्तक्षेप होत असल्याची तक्रार केली होती. बेळगाव येथील हिंडाल्को प्लांटमध्ये बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याची तक्रारही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपनीचे 15 कोटींचे नुकसान

'एमपीए'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात आदित्य बिर्ला ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी 'एमपीए'ला सांगितले होते की, जर राजकीय हस्तक्षेप असाच सुरू राहिला तर आम्हाला जयगड बंदरावर व्यवसाय स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि झालेही तसेच.

आदित्य बिर्ला समूहाला त्यांचा माल १० दिवसांहून अधिक काळ बंदरातून बाहेर नेण्यास रोखल्याने सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

मालवाहतुकीला अडथळा

आदित्य बिर्ला ग्रुपने बॉक्साईट जयगड बंदराकडे वळविण्यात आले आहे; कारण जेव्हा तुम्ही परवानगीसाठी अर्ज करता, तेव्हा वाहतुकीसाठी परवानगी दिली जात नाही. तिथे मालवाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो.

अशा प्रकारांमुळे कंपन्या मुरगाव बंदरात उद्योग व्यवहार करण्यास अजिबात धजत नाहीत, अशी प्रतिक्रिया मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT