Bird festival organize on 16 & 17 December in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पाचवा पक्षी महोत्सव लवकरच

पक्षी निरिक्षणाबरोबरच दोन्ही दिवशी तज्ज्ञांच्या व्याख्यानांची मेजवानी असलेल्या पक्षी महोत्सव यंदा 16 आणि 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पक्षी निरिक्षणाबरोबरच दोन्ही दिवशी तज्ज्ञांच्या व्याख्यानांची मेजवानी असलेल्या पक्षी महोत्सव यंदा 16 आणि 17 डिसेंबर रोजी होणार आहे. वनखाते आणि गोवा (Goa)बर्ड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी पक्षीप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक संतोषकुमार यांनी केले आहे. चोडण, करमळी, दिवाड बेट आणि आगशी कांदळवनात पक्षी निरिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Bird festival organize on 16 & 17 December in Goa)

गेल्या शनिवारपासून राज्यातील विविध भागात पक्षी निरिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी मोलेम आणि नेत्रावळी अभयारण्यात, तर रविवारी म्हादई आणि खोतीगाव अभयारण्यात पक्षी निरीक्षण करण्यात आले असून यावेळी अनेक पक्षीप्रेमींनी सहभाग दर्शविला. येत्या शनिवारी बोंडला आणि नेत्रावळी अभयारण्य, 5 रोजी मोलेम आणि खोतीगाव अभयारण्य, 11 रोजी साकोरा आणि वेर्णा पठार, 12 रोजी दिवाड बेट आणि कुडतरी येथे पक्षी निरीक्षणाची संधी पक्षीप्रेमींना लाभणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून या महोत्‍सवाचे आयोजन केले जाते. यंदाचे हा पाचवे वर्ष असून पक्षीप्रेमींची संख्या वाढविण्यासाठी प्रि-फेस्टिवलची संकल्पना राबविण्यात आली आहे. 16 व 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या पक्षी महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षीप्रेमींनी वनखात्याच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT