Birch Case Goa Dainik Gomantak
गोवा

'बर्च' प्रकरणी सह-मालक अजय गुप्ताला 5 दिवसांची पोलीस कोठडी; बनावट प्रमाणपत्रे आणि फसवणुकीचा पर्दाफाश

Ajay Gupta Police Custody: 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबचे सह-मालक अजय गुप्ता याला न्यायालयाने त्याल ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

Akshata Chhatre

म्हापसा: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबचे सह-मालक अजय गुप्ता याला म्हापसा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याल ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाईट क्लबसाठी आवश्यक असणारे व्यावसायिक परवाने मिळवण्यासाठी गुप्ता यांनी बनावट आरोग्य प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

बनावटगिरी आणि फसवणुकीचे रॅकेट

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, नाईट क्लब चालवण्यासाठी लागणारी वैधानिक परवानगी मिळवण्यासाठी गुप्ता यांनी बनावट कागदपत्रे आणि आरोग्य प्रमाणपत्रे सादर केली होती.

ही केवळ प्रशासनाची फसवणूक नसून, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी सामील आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

पोलीस तपासाला वेग

न्यायालयाने दिलेल्या ५ दिवसांच्या कोठडीत पोलीस आता अजय गुप्ता याची कसून चौकशी करणार आहेत. या कालावधीत बनावट प्रमाणपत्रे कोणी तयार केली आणि यासाठी कोणाकोणाची मदत घेण्यात आली, याचे पुरावे गोळा केले जाणार आहेत.

६ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण आगीत २५ जणांचा बळी गेल्यानंतर या क्लबच्या कारभारातील एकामागून एक धक्कादायक गैरप्रकार समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात नाताळचा उत्साह! मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून शांतता व एकात्मतेचा संदेश; आर्चबिशपांनी केली शांततेची प्रार्थना

कलंगुट पोलिसांची मोठी कारवाई! साडेचार लाखांच्या ड्रग्जसह हळदोणचा तरुण गजाआड; ख्रिसमसच्या तोंडावर तस्करांचे धाबे दणाणले

Goa Politics: 'त्याचा' फटका विधानसभेत बसणार नाही! मतांच्या टक्केवारीतून जनतेने भाजपलाच कौल दिला; दामू नाईक

आयपीएल 2026 पूर्वी आरसीबीचं वाढलं टेन्शन, लैंगिक अत्याचारप्रकरणी स्टार गोलंदाजाला कोर्टाचा दणका; कोणत्याही क्षणी अटक?

Goa Politics: "ते म्हणणं शाब्दिक अर्थाने घेऊ नका", सत्यविजय नाईकांचे 'बॅकस्टॅबिंग'; दामू नाईकांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT