Bilawal Bhutto India Visit Dainik Gomantak
गोवा

SCO Summit Goa 2023: हस्तांदोलन अन् डिनर; बिलावल आणि जयशंकर यांची भेट, द्विपक्षीय बैठकीची शक्यता कमी

तब्बल 12 वर्षांनंतर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत.

Pramod Yadav

Bilawal Bhutto India Visit For SCO Summit Goa 2023: गोव्यात सध्या शांघाय सहकार्य संघटनेची बैठक सुरू आहे. बैठकीच्या पहिल्या दिवशी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी सायंकाळी रशिया, चीन, पाकिस्तान आणि SCO च्या इतर सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसाठी भव्य स्वागत समारंभ आयोजित केला होता.

स्वागत समारंभानंतर डिनरचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी परराष्ट्र मंत्र्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो आणि एस जयशंकर यांच्या हालचालीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले.

तब्बल 12 वर्षांनंतर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार शांतता चर्चेसाठी भारत भेटीवर आल्या होत्या.

गोव्यातील बाणावली येथील समुद्रकिनारी असलेल्या ताज एक्सोटिका रिसॉर्टमध्ये झालेल्या या स्वागत समारंभात चीनचे परराष्ट्र मंत्री किन कांग, रशियाचे सर्जी लावरोव आणि पाकिस्तानचे बिलावल भुत्तो झरदारी, उझबेकिस्तानचे बख्तियार सैदोव आणि एससीओचे महासचिव झांग मिंग उपस्थित होते.

तसेच, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानचे परराष्ट्र मंत्रीही या समारंभात उपस्थित होते. संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलीवूड मधील नृत्य तसेच भारतीय शास्त्रीय आणि लोकनृत्य सादर करण्यात आले.

द्विपक्षीय बैठकीची शक्यता कमी

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि बिलावल भुत्तो यांच्यात द्विपक्षीय बैठकीची सध्या कोणतेही संकेत नाहीत. पाकिस्तानकडून याबाबत अद्याप कोणतीही विनंती समोर आलेली नाही.

SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी गोव्यात पोहोचून मला खूप आनंद होत आहे. मला आशा आहे की SCO CFM बैठक यशस्वी होईल. मी माझ्या दौऱ्यादरम्यान माझ्या मित्र देशांतील माझ्या समकक्षांशी रचनात्मक चर्चेसाठी उत्सुक आहे. असे मत बिलावल यांनी गोव्यात पोहोचल्यावर व्यक्त केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT