Porvorim Accident Dainik Gomantak
गोवा

Accident: पर्वरी येथे अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

दुचाकी आणि चार चाकी यांच्यात झाली टक्कर

दैनिक गोमन्तक

पर्वरी येथे कदंब डेपोकडे जाणाऱ्या सिग्नल जवळ दुचाकी आणि चार चाकी इनोवा यांच्यात अपघात झाला आहे. हा अपघात रात्री 8 च्या दरम्यान झाला असुन यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघावेळी दुचाकी चालकाच्या पायाची बोटे तुटली असुन चार चाकी चालक फरार झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. असे असले तरी या अपघातातील जखमींची नावे अथवा मिळू शकलेली नाही.

(Bike rider seriously injured in an accident at Porvorim)

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात इतका गंभीर होता की, यामध्ये दुचाकी आणि चार चाकी इनोवा यांच्यात टक्कर होताच दुचाकी चालक काही सेकंदात सहा ते सात वेळा गोल फिरत रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. आणि त्याच्या पायाची बोटे तुटून गेली. या अपघातातील दुचाकी चालकाने हेल्मेट घातले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघात घडल्यानंतर जखमी दुचाकी चालकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच चार चाकी वाहनातील चालक फरार झाला झाला असुन अपघातावेळी या रस्त्याची वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती. यामुळे रस्त्याला वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT