Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: धारगळ येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

Goa Accident Death: बॅरीकेडला धडक: घरी परतताना उड्डाणपुलावर दुर्घटना

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death:

सुकेकुळण - धारगळ येथील राष्ट्रीय महामार्ग 66 च्या उड्डाण पुलावर आज दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्वयं अपघातात पेंढराचीवाडी - वेंगुर्ला येथील संजय सुरेश जळवी (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला.

करासवाडा - म्हापसा येथील एका पेट्रोल पंपवर ते कामाला होते. दुपारी एमएच - 07- व्ही - 7161 या क्रमांकाच्या मोटारसायकलने ते वेंगुर्ला येथे आपल्या घरी जात असताना त्यांच्या मोटारसायकलची रस्त्याच्या बाजूच्या बॅरीकेटला धडक बसून पडल्याने ते जागीच ठार झाले.

पेडणे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर व हवालदार प्रसाद तुयेकर यांनी पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवला आहे.

टेंपोखाली सापडून बालक जखमी

मंगादो, खोर्ली - जुने गोवे येथे टेम्पोच्या चाकाखाली आल्याने दोन वर्षांचा मुलगा सत्विक गुंगी (मूळ कारवार, सध्या राहणार खोर्ली) हा गंभीर जखमी झाला. मुलाला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

जुने गोवे पोलिसांनी वाहनचालक मल्लिका अर्जुन (वय 23, खोर्ली) याच्याविरोधात गुन्हा नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.35 च्या दरम्यान हा अपघात झाला.

मुलाची आई मुलाला सोबत घेऊन मंदागो - खोर्ली येथे चालत जात असता तेथे आलेल्या टेंपोसमोर (क्र. जीए - ०७ - एफ - ६३९७) तो अचानक धावला व टेंपोच्या चाकाखाली सापडला. अपघातानंतर त्याला खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथून त्याला गोमेकॉत पाठवले गेले.

मुलाला अतिदक्षता विभागात ठेवेल असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जुने गोवे पोलिस ठाण्याचे हवालदार प्रेमनाथ पार्सेकर यांनी गुन्हा नोंद करून वाहनचालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT