Jetty  Dainik Gomantak
गोवा

Panaji: जिवाची बाजी लावून जेटी धोरणाला विरोध करू; रविवारी आझाद मैदानावर भव्य दुचाकी रॅली

हजारो आंदोलक दुचाक्यावरून रविवारी गाठणार पणजीचे आझाद मैदान

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या नव्या जेटी धोरणाला राज्यातून विरोध वाढत आहे. नव्या जेटी धोरणाला संघटीत विरोधात करण्यासाठी येत्या रविवारी (दि. 30) पणजीतील आझाद मैदानावर दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरात 'चलो आझाद मैदान' आंदोलन छेडण्यात आले आहे. रविवारी गोव्यातील विविध ठिकाणावरून हजारो आंदोलक दुचाकीसह पणजीतील आझाद मैदानावर धडक देणार आहेत.

दुचाकी आंदोलनात सासष्टी तालुक्यातून सर्वात जास्त आंदोलक भाग घेणार असून त्यासाठी संपूर्ण तालुक्यात जागृती सभा आयोजीत करण्यात येत आहेत. सासष्टी मधील राय, लोटली, कामुर्ली, ओर्ली, चांदर, बोरी, शिरोडा, करमणे, केळशी, असोळणा तसेच दक्षिण गोव्यातील अन्य भागातून आंदोलक या आंदोलनात भाग घेणार आहेत. यापूर्वी या भागात झालेल्या ग्रामसभातून सरकारच्या या धोरणाला तीव्र विरोध केला होता.

नवे जेटी धोरण म्हणजे केंद्र सरकारने लोकांच्या विरोधासमोर नमते घेऊन सागरमाला हा प्रकल्प गुंडाळून ठेवला होता. आता या राज्य सरकारच्या धोरणाद्वारे मागच्या दाराने तोच पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप या ग्रामसभेत आंदोलकांनी केला होता.

रविवारी होणाऱ्या दुचाकी रॅलीची सुरूवात प्रत्येक गावातून होणार आहे. 'मंत्री रोहन खवंटे लोकांची दिशाभूल करत असून हे धोरण पर्यटन विकासाठी नसून गावातील जेटी कोळसा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आहे. आम्ही आमच्या जिवाची बाजी लावून या धोरणाला विरोध करू असे आंदोलक झेवियर फर्नांडीस यांनी सांगितले.

'रविवारच्या या रॅलीतून आम्ही आमची ताकद सरकारला दाखवून देऊ. हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे धोरणं लागू झाल्यास नदीवर अवलंबून असलेले सर्व व्यवसायिक देशोधडीला लागतील,' अशी भीती कुस्तोदियो डायस यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT