Calangute Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: दुचाकी, मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Goa Crime News: दोघे अटकेत : ४ लाखांचा मुद्देमाल जप्‍त; पोलिसांची धडक कारवाई

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: पर्वरी पोलिसांनी दुचाकी तसेच मोबाईल फोन चोरी करण‍ाऱ्या टोळीचा पदार्फाश करताना दोन युवकांना अटक केली. शब्बीर बळ्ळुर (२४, वेरे) व सुनील बी. के. (२२, कळंगुट व मूळ नेपाळ) अशी त्‍यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दोन दुचाकी चोरीला गेल्‍याच्‍या तक्रारी आल्‍या होत्या. त्‍यात होंडा हॉर्नेट (जीए ०७ वाय ७५११) व हिरो डिलक्स (केए ७१ एच ०७११) या वाहनांचा समावेश होता.

या दोन्ही वाहनांची किंमत १ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. त्यानुसार, पर्वरी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत वरील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनी आपल्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी संशयितांकडून दोन्ही चोरीला गेलेली वाहने तसेच आणखीन दोन मोटरसायल्‍स, सहा मोबाईल फोन जप्त केले. हा संपूर्ण मुद्देमाल ४ लाखांचा आहे. पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब, कॉन्स्टेबल महादेव नाईक, उत्कर्ष देसाई, नितेश गावडे, योगेश शिंदे यांनी सापळा रचून चोरट्यांच्‍या मुसक्या आवळल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT