State Bank Theft Dainik Gomantak
गोवा

State Bank Theft: एटीएम समजून प्रिंटर मशिन चोरणाऱ्यास अटक; संशयित मूळचा बिहारचा

मशिनची केली नासधूस

Akshay Nirmale

State Bank Theft: खांडेपार-फोंड्यातील स्टेट बँकेच्या शाखेत रविवारी मध्यरात्री चोरट्याने एटीएम मशीन समजून चक्क पासबूक प्रिंटिंग मशीनच पळविले होते. त्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. गौतमकुमार रंजनकुमार रे (वय 29) असे त्याचे नाव आहे.

तो मूळचा फाजिलपूर, बेगुसराय बिहार येथील आहे. बँकेचे व्यवस्थापक रोहित त्रिलोकीनाथ विश्वकर्मा यांनी याबाबत तक्रार दिली होती.

रविवारी चोरट्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खांडेपार शाखेत चोरी केली होती. त्याने एटीएम मशिन समजून पासबूक प्रिंटिंग मशिन पळवले होते. एकूण दीड लाख रूपयांचा मुद्देमाल त्याने चोरला होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास केला. चोरट्याचे वर्णन, देहबोली, चालण्याची शैली, उंची आणि त्याच्या चपलेवरून तपास करून पोलिसांनी रोहित विश्वकर्मा याला शोधून काढले.

चोरट्याने हे मशीन रस्त्यावर आणून फोडले होते, पण त्याला आतमध्ये काहीच सापडले नाही. संबंधित चोरटा रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास बँकेत शिरला. त्याने चेहरा शर्टने पूर्णपणे झाकला होता.

आत शिरून त्याने एटीएम समजून प्रिंटिंग मशीन तोडले आणि सायकलवर लावून तेथून त्याने पलायन केले. चोरीचा हा प्रकार आज सोमवारी बँकेचे कर्मचारी सकाळी बँकेत आल्यानंतर समजला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT