Goa Police News: navin batra arrested  Dainik Gomantak
गोवा

Goa Police News: छत्तीसगडमधील बडा सट्टाकिंग गोवा पोलिसांच्या जाळ्यात; दुबईपर्यंत आहे कनेक्शन

गोवा पोलिसांची कारवाई; बराच काळ होता फरार

Akshay Nirmale

Goa Police News: छत्तीसगड पोलिसांनी ऑनलाइन गेमिंग महादेव सट्टा अॅपवर कारवाई तीव्र केली आहे. याप्रकरणी पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले. छत्तीसगडमधून फरार असलेला बुकी नवीन बत्रा याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. बत्रा हा बराच काळ फरार होता.

गोवा पोलिसांनी नुकतेच पर्वरी येथील एका हॉटेलमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीवर कारवाई केली. न्यूझिलंड विरुद्ध यूएई यांच्यातील T-20 सामन्यात येथे ऑनलाईन सट्टा स्विकारला जात होता. सट्टेबाजीसाठी वापरण्यात येत असलेले साहित्य या हॉटेलच्या खोलीतून जप्त करण्यात आले.

या वेळी पोलिसांनी नवीन बत्रा (छत्तीसगड) या फरार बुकीसह संजय सुब्बा (दिल्ली), करण राजेश पाटील (अकोला), अमित मोरे (अकोला), अंकित कुमार (झारखंड), वरिंदर सिंग एन., सूरज नागदेव, किशन पोपटनी, तिलेश कुमार कुर्रे, श्रेय शर्मा एन. (सर्व छत्तीसगड) व आशिष एन. (राजस्थान) यांना अटक केली होती.

रायपूर पोलिस बत्रा याला ताब्यात घेणार आहेत. नवीन बत्रा हा छत्तीसगडचा मोठा बुकी आहे. नवीन हा महादेव हे ऑनलाइन अॅपचे चार पॅनल चालवतो. सूरजपूरमधील व्यावसायिकाच्या आत्महत्येशिवाय रायपूरमध्येही नवीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बत्रा हा ऑनलाइन सट्टेबाजी अॅपमधील एक मोठा किंगपिन मानला जातो. त्याचे कनेक्शन दुबईपर्यंत असल्याचे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 WC 2026: आफ्रिकेचा 'विजयी षटकार'! वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत सेमीफायनलचं तिकीट केलं पक्क; मार्करमची तुफानी खेळी ठरली निर्णायक VIDEO

Shirgao Lairai Jatra: ''6 मार्चपर्यंत क्राउड मॅनेजमेंट प्लॅन सादर करा'', शिरगाव जत्रेबाबत हायकोर्टाचा कडक आदेश; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

Budh Vakri 2026: 23 दिवसांचा 'राजयोग'! बुधाची वक्री चाल पालटणार 'या' 3 राशींचं आयुष्य; 21 मार्चपर्यंत बरसणार पैशांचा पाऊस

Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

Operation Sindhur 2.0: 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ने उडणार पाकड्यांचा थरकाप, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचा थेट इशारा; शत्रूच्या छाताडावर नाचणार 'भैरव' सैन्य! VIDEO

SCROLL FOR NEXT