Mavin Gudinho
Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

गोवा शिपयार्डमध्ये रोजगार प्रकरणी मोठे रॅकेट; मावीन गुदिन्हो

दैनिक गोमन्तक

वास्को: पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनीही गोवा शिपयार्डतील नोकर भरतीचा प्रश्न मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्यासमोर नेण्याचे संकेत दिले आहे. गोवा शिपयार्डमध्ये रोजगार प्रकरणी मोठे रॅकेट असल्याचा आरोप त्यांनी केला. नोकर भरतीच्या वेळी गोवा शिपयार्ड स्थानिकांना डावलते. गोवा शिपयार्डच्या नोकर भरतीच्या जाहिराती गोव्यापेक्षा इतर राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये अधिक प्रमाणात देण्यात येतात. गोवा शिपयार्डने गोमंतकीयांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला.

(Big racket in employment case at Goa Shipyard Allegations of Mavin Gudinho)

गोवा शिपयार्डमध्ये नोकर भरतीत मोठा घोटाळा सुरू असून शिपयार्डने गोमंतकीय तरुणांना नोकरी देण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी केला. नवेवाडे येथे श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थानला सौर ऊजाॆ निमिॆती प्रणाली पुरस्कृत कार्यक्रमानंतर पत्रकारांशी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थानचे अध्यक्ष तुळशीदास पटेकर, नगरसेवक विनोद कीनळेकर,प्रकाश गावस,अनीता थोरात, घनश्याम गडेकर, अशोक झेमणे व इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री गुदीनो म्हणाले की, गोवा शिपयार्डवर नोकर भरतीविषयी बोलताना गोवा शिपयार्डमधील नोकर भरती बहुतांश जाहिराती गोव्याबाहेरील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येतात. त्यांना नोकरीसाठी स्थानिक नव्हे तर राज्याबाहेरील उमेदवार हवे आहेत हे स्पष्ट होते. यापैकी काही जणांना इंग्रजी नसल्याचे दिसून आले आहे.

अशा तरुणांना शिपयार्डमध्ये योग्य प्रशिक्षण देऊन त्याला नोकरीत समावून घेतले जाते'असे गुदिन्हो म्हणाले. नोकरीविषयक जास्तीत जास्त जाहिराती राज्याबाहेरील वृत्तपत्रांना दिल्या जात आहेत. यातून त्यांना नोकरीसाठी गोमंतकीय तरुण नको, बाहेरील तरुण पाहीजे असल्याचे स्पष्ट होते. 'शिपयार्डच्या अशा कार्यपद्धतीमुळे गोमंतकीय संतापलेले असून ते या विरोधात रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत.

(Goa Latest News)

गेल्या काही दिवसांपासून त्यापैकी अनेक तरुणांना मी शांत केले आहे. भविष्यात जर गोमंतकीय तरुणांना नोकरी न मिळाल्यास लोक रस्त्यावर उतरतील' असा इशारा मंत्री गुदिन्हो यांनी दिला.

"जीएसएल नोकऱ्यांसाठीच्या जागा इतर राज्यांच्या वृत्तपत्रांमध्ये अधिक प्रकाशित केल्या जातात आणि हे दर्शविते की त्यांना जीएसएलमध्ये नोकऱ्यांसाठी बाहेरील लोकांची गरज आहे. हे जीएसएल मध्ये नोकऱ्यांचे एक मोठे रॅकेट आहे ते स्थानिकांना काम देत नाहीत. रोजगाराचा मुद्दा केंद्रीय संरक्षण मंत्री आणि इतर केंद्रीय मंत्रालयांसोबत उचलून धरतील,” असे गुदिन्हो यांनी सांगितले.

"तो दिवस दूर नाही जेव्हा लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील आणि त्यांची कामे थांबवतील. मी लोकांना धरून आहे, पण मी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे."

शिपयार्डच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे स्थानिकांना वगळून गोमंतकीयांच्या परीक्षा घेऊन नये' असे ते गुदिन्हो म्हणाले. या विषयाबाबत मी यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आता पुन्हा चर्चा करून हा विषय केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे मांडून गोमंतकीयांना नोकरी उपलब्ध करण्याबाबत बोलण्यास सांगणार आहे असे गुदिन्हो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT