Unexplored Goa Series on National Geographic Channel  Dainik Gomantak
गोवा

Unexplored Goa Series: मोठी बातमी! 'नॅशनल जिओग्राफिक'वर पाहायला मिळणार अनएक्सप्लोर्ड गोवा?

राज्य सरकार सीरीज सुरू करण्याच्या विचारात; चॅनेलशी साधला संपर्क

Akshay Nirmale

Unexplored Goa Series On National Geographic: गोव्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार अनएक्सप्लोर्ड गोवा या नावाने सीरीज सुरू करण्याच्या विचारात आहे.

त्यासाठी पर्यटन विभागाने नॅशनल जिओग्राफिक या दूरचित्रवाणी वाहिनीशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

या मालिकेतून गोव्यातील न पाहिलेल्या स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने समोर आणले जाणार आहे. त्यासाठी कंटेट तयार करण्यासाठी पर्यटन विभाग 3.5 कोटी रूपये खर्च करणार आहे. स्थानिक इको टूरिझम ग्रुप्सचे यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे.

अनोखा, काही वेगळ्या पर्यटनाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या काही प्रवाशांसाठी हा ऑफ बीट अनुभव ठरणार आहे.

या सीरीजच्या कंटेटसाठी गोव्यातील समुद्रकिनारे आणि राज्याचा किनारी पट्टा, अद्याप पर्यटकांची उपस्थिती नसलेले बॅकवॉटर, गोव्याचा अंतर्गत भाग जो समुद्र नद्यांपासून दूर आहे अशी स्थळे, अॅडव्हेंचर आणि वॉटर स्पोर्ट्स, ग्रामीण संस्कृती आणि वारसा, कला, वास्तुकला, हस्तकला, उत्सव याबाबतचे विषय असणार आहेत.

व्हिडिओ आणि त्यासंबंधित कंटेटमधून संपुर्ण गोवा कसा आहे, ते दिसून येईल. स्थानिक लोकांच्या, अधिकाऱ्यांच्या मुलाखतींतून विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे.

नॅशनल जिओग्राफिक चॅनेलचा प्रेक्षकवर्ग जगभरात आहे. ते तपशीलात माहिती देत असतात. त्यातून नक्कीच गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटन विभागाने नॅशनल जिओग्राफिकच्या माध्यमातून प्रॉडक्शन, प्रसारण आणि पर्यटन प्रोत्साहनासाठी एजन्सी नेमण्यासाठी यापुर्वीच निविदादेखील काढली आहे.

प्रवाशांना गोव्यात काय शोधायचे हे ठरवण्यास मदत करणारा हा उपक्रम असेल. शांत वातावरणात रस असलेल्या हाय क्लास पर्यटकांना यातून आकर्षित केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT