Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: गोव्यात काहीही करा पण... प्रसिद्ध व्लॉगरने शेअर केला गोव्यातील गंडवा गंडवीचा व्हिडिओ

गोव्यात मौजमजा केल्यानंतर मिठाई खरेदी केली पण, त्यातून पदरी निराशा आल्याचे या व्लॉगरने म्हटले आहे.

Pramod Yadav

Goa Viral Video: गोव्यात देश-विदेशातील अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. येथे आल्यावर विविध वस्तू खरेदी करण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. पण, एका प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लाॅगरने गोव्यातील गंडवागंडवीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

गोव्यात मौजमजा केल्यानंतर मिठाई खरेदी केली पण, त्यातून पदरी निराशा आल्याचे या व्लॉगरने म्हटले आहे.

रोहित खोत या व्लॉगरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने गोव्यातीला त्याचा अनुभव शेअर केला आहे. गोव्यात विविध ठिकाणी फिरून मौजमजा केल्यानंतर मिठाईची अनेक दुकाने दिसली, मिठाई घरी घेऊन जावी म्हणून 200 रुपयांना पाच मिठाईची बॉक्स खरेदी केले.

घरी जाऊन मिठाईचे बॉक्स खरेदी केले असते मिठाईचे तुकटे बॉक्सच्या सभोवताली उभे करण्यात आले होते व आतून बॉक्स रिकामे असल्याचे दिसून आले, असे रोहितने त्याच्या व्हिडिओत म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर मिठाईत फक्त साखरेचा चव येत असल्याचेही त्याने म्हटले आहे. पाचजणांनी खरेदी केलेल्या बॉक्स अशाच प्रकारचे होते, मिठाई दिसायला वेगळी असून सर्वांची चव एकसारखीच असल्याचे रोहितने म्हटले आहे.

गोव्यातील विविध प्रकरणं अनेकांनी सांगितली होती मात्र ही गंडवागंडवी मला नव्याने कळाली. त्यामुळे पुढच्या वेळी गोव्याला गेल्यावर अशा प्रकारचे मिठाईचे बॉक्स खरेदी करु नका, असाही सल्ला रोहितने त्याच्या व्हिडिओच्या माध्यामातून दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT