Big Bash 2024-25 | Big Daddy Casino X
गोवा

Big Daddy Casino 2024-25: 'बिग बॅश'मध्ये रंगणार रॅपर किंगचा शो, मध्यरात्री ५०० ड्रोनचा Display

Goa Big Bash 2024-25: दरम्यान, २५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या बिग बॅश सोहळ्यात अभिनेत्री तमन्ना भाटियाने २५ रोजी रंगमंचावर आपल्या अदाकारीने शोभा वाढवली होती.

Sameer Panditrao

Big Bash 2024-25 31St December

पणजी: बिग डॅडी कॅसिनो नव वर्षाच्या पूर्वसंध्येला गायक-रॅपर किंगच्या शोस्टॉपिंग परफॉर्मन्ससह आकर्षक बनणार आहे. ‘बिग बॅश २०२४-२५’ असे या महोत्सवाला नाव दिले आहे. दि. ३१ रोजी मध्यरात्री एक भव्य ‘ड्रोन शो’ राज्याच्या इतिहासात प्रथमच ५०० ड्रोन नवीन वर्षाच्या काउंटडाऊनच्या आधी १५ मिनिटांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या डिस्प्लेमध्ये मांडवी तिरावरचे आकाश प्रकाशित करतील हा नेत्रदीपक शो स्थानिक आणि पर्यटक दोघांनीही यंदा पहावा, असा ठरणार आहे.

दरम्यान, २५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या बिग बॅश सोहळ्यात अभिनेत्री तमन्ना भाटियाने २५ रोजी रंगमंचावर आपल्या अदाकारीने शोभा वाढवली होती. तिने जादुई परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांना मुग्ध केले. उत्साहात भर घालत, नववर्षाच्या पूर्वसंध्येला बिग डॅडी कॅसिनो गोव्यासाठी एक ऐतिहासिक क्षण सादर करणार आहे.

२६ रोजी ‘झलक दिखला जा’ फेम स्कार्लेट विल्सनने उपस्थितांना भुरळ घातली. दि. २७ रोजी मन्नारा चोप्रा यांच्या कार्यक्रमालाही प्रचंड प्रतिसाद लाभला. २९ रोजी जोनिता गांधी यांनी सोहळ्यात रंगत आणली.

विलक्षण अनुभवासाठी या!

३० रोजी कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर आणि सुनील ग्रोव्हर यांनी आपल्या विनोदांनी हास्याचे तुषार उडवले. मांडवी पात्रातील बिग डॅडी कॅसिनो बोटीवरील विलक्षण उत्सवासाठी २०२४ या वर्षाला निरोप देण्याचा आणि २०२५ या नववर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम चुकवू नका, ‘किंग रॉक द बोट’चे साक्षीदार होण्यासाठी आणि बिग बॅश २०२४-२५ च्या जादूचा अनुवभ घेण्यासाठी या, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT